Share Market Latest Updates esakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार वधारला; सेन्सेक्समध्ये 369.9 तर निफ्टी 64.55 अंकांची वाढ

Share Market Updates: आज बुधवारीही शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजार सावरल्याचं चित्र होते. आज बुधवारीही शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात झाली आहे. आज सेन्सेक्स (Sensex) आज 369.9 अंकाच्या वाढीसह 53793.99 सुरु झाला. निफ्टी (Nifty) आज 64.55 अंकाच्या वाढीसह 16078वर सुरु झाला. पहिल्या पंधरा मिनिटांनंतर शेअर बाजारात 38 शेअर सकारात्मक ट्रेड करत आहेत. तर 12 स्टॉक्सची नकारात्मक सुरुवात झाली. (Positive opening in stock market today.)

मंगळवारचा दिवस शेअर बाजारासाठी वरदान ठरला कारण गेल्या सलग 4 दिवसांची घसरण थांबलेली दिसून आली आणि सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या चिन्हात बंद झाले. फार्मा आणि आयटी शेअर्सचा मोठा सपोर्ट मिळाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 581.34 अंकांच्या म्हणजेच 1.10 टक्क्यांच्या वाढीसह 53,424.09 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 150.30 अंकांच्या म्हणजेच 0.95 टक्क्यांच्या वाढीसह 16,013.45 वर बंद झाला.

फार्मा आणि आयटीसारख्या निर्यात-केंद्रित क्षेत्रांचा बाजाराला फायदा झाल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. रुपयाने विक्रमी नीचांकी पातळी गाठल्यानंतर फार्मा आणि आयटी क्षेत्रातील शेअर्स जोशात दिसले. तर निवडणुकीत भाजपच्या बाजूने एक्झिट पोल आल्याने मिड आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT