Sunflower Oil Sakal
अर्थविश्व

युद्धामुळे सूर्यफूल तेलाच्या किमतीने गाठला उच्चांक; प्रतिलिटर दर 190 रुपयांवर पोहोचला

रशिया-युक्रेन युद्धामुळे ब्रँडेड सूर्यफूल तेलाच्या किमती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे ब्रँडेड सूर्यफूल तेलाच्या किमती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. ग्राहकांना सूर्यफूल तेलाच्या 15 लिटरच्या कॅनसाठी सुमारे 3,000 रुपये मोजावे लागत आहेत.

“सूर्यफूल तेलाची प्रति लिटर किंमत तीन महिन्यांपूर्वी 140-150 रुपयांच्या दरम्यान होती, परंतु सध्या मात्र ती 170-190 च्या दरम्यान आहे,” असे कृषी उत्पन्न पणन समितीचे अधिकारी तसेच गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले. (Russia Ukraine war has pushed up the price of sunflower oil)

गेल्या वर्षी ब्रँडेड सूर्यफूल तेलाच्या 15 लिटर कॅनची सर्वोच्च किंमत 2,400 रुपये होती, परंतु सध्या सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine War) वाईट परिणाम आयातीवर झाला आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यांचा मेळ न बसल्यामुळे सूर्यफूल तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

रिफाइंड सूर्यफूल तेलाची स्थानिक बाजारपेठेत किंमत 2,650 ते 3,100 रुपये प्रति 15 लिटर आहे. भारत रशिया आणि युक्रेनमधून ७०% सूर्यफूल तेल आयात करतो. दोन्ही देशांमधील तणावामुळे पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. भारतीय उत्पादकांकडून पुरेसा पुरवठा होत नाही. सूर्यफूल तेलाचा पुरवठा थांबल्यामुळे पाम, शेंगदाणे आणि सोयाबीन यांसारख्या विविध प्रकारच्या स्वयंपाकाच्या तेलाच्या मागणीत वाढ झाली आहे, पंरतु गेल्या काही महिन्यांपासून मागणी-पुरवठ्यात फरक दिसून येत आहे, असं गुलटेकडी मार्केट यार्डातील तेल व्यापाऱ्यांनी सांगितले.

"शहरातील स्थानिक बाजारपेठेत सोयाबीन, शेंगदाणे आणि पामतेलचे प्रति लिटर भाव रु. 130 ते रु. 170 च्या दरम्यान विकले जात आहेत," असं पुणे जिल्हा, किराणा असोसिएशनचे अध्यक्ष सचिन निवांगुणे म्हणाले.

सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बी.व्ही. मेहता म्हणाले, "सोयाबीन आणि मोहरीचे पीक चांगले असल्याने भाव खाली येऊ शकतात आणि स्थानिक तेल उत्पादक येत्या काही दिवसांत चांगल्या प्रमाणात तेलाचा पुरवठा करू शकतात."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT