SIP esakal
अर्थविश्व

SIP: 20 वर्षांत 2 कोटी! महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल?

म्युच्युअल फंडमध्ये लाँग टर्मसाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते असा विश्वास तज्ज्ञांना आहे.

शिल्पा गुजर

म्युच्युअल फंडमध्ये लाँग टर्मसाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते असा विश्वास तज्ज्ञांना आहे.

म्युच्युअल फंड एसआयपी लॉन्‍ग टर्मसाठी ठेवल्यास, गुंतवणूकदारांना त्यात चक्रवाढीचा अर्थात कम्‍पाउंड इंटरेस्टचा प्रचंड फायदा होतो. दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून कोट्यवधी रुपयांचा निधी तयार करता येतो. म्युच्युअल फंडाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये 10, 15 वर्षांसाठी एसआयपी परतावा (Return) 12 टक्क्यांहून अधिक आहे. जर तुम्ही 20 वर्षांत 2 कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले असेल, तर तुम्हाला महिन्याकाठी 20,000 रुपये एसआयपी करावी लागेल.

20,000 रुपये महिना एसआयपीचे कॅलक्युलेशन

जर तुम्ही महिन्याला 20,000 रुपयांची SIP केली आणि स्किमचा वार्षिक परतावा 12 टक्के असेल, तर तुम्ही 20 वर्षांमध्ये सुमारे 2 कोटी रुपये (1,99,82,958) जमा कराल. यात तुमची गुंतवणूक 48 लाख रुपये असेल आणि वेल्थ गेन 1.5 कोटी रुपये (1,51,82,958) असेल. जर तुम्ही मासिक 20,000 रुपये SIP करत असाल आणि योजनेचा वार्षिक परतावा 15 टक्के असेल, तर तुम्ही 18 वर्षांमध्ये रु. 2.2 कोटी (22085106) जमा कराल. यात तुमची गुंतवणूक 43.2 लाख रुपये असेल आणि वेल्थ गेन सुमारे 1.8 कोटी रुपये असेल.

काही फंड्स तर 15 वर्षांमध्ये वार्षिक परतावा 12 टक्के किंवा त्याहून अधिक देतात. क्वांटम लाँग टर्म इक्विटी व्हॅल्यू फंड 2006 मध्ये सुरू करण्यात आला. लाँच झाल्यापासून वार्षिक परतावा सरासरी 14 टक्के आहे. त्याचप्रमाणे निप्पॉन इंडिया ईटीएफ बँक बीईएस योजना 2004 मध्ये सुरू करण्यात आली. लाँच झाल्यापासून त्याचा सरासरी 17 टक्के परतावा आहे.

SIP चे लॉन्‍ग टर्म फायदे

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतही जोखीम असते. बाजारातील अस्थिरतेचा फंडाच्या कामगिरीवर परिणाम होतो. लाँग टर्मसाठी एसआयपीमध्ये पैसे गुंतवण्याचे अनेक फायदे असल्याचे वेल्थ मॅनेजमेंट कंपनी फिंटूचे सीईओ मनीष पी. हिंगर म्हणाले. एमर्जंसी असल्याशिवाय एसआयपी बंद करू नये किंवा थांबवू नये असा सल्लाही तज्ज्ञ देतात.

गुंतवणूकदाराने त्याचे उत्पन्न, टारगेट आणि रिस्क प्रोफाइल पाहून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा असे बीपीएन फिनकॅपचे संचालक ए के निगम म्हणाले. एसआयपीची (SIP) सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही अगदी छोट्या बचतीतूनही गुंतवणूक सुरू करू शकता. आजकाल, अनेक स्किम्समध्ये 100 रुपये मासिक SIP चा पर्याय उपलब्ध आहे. लाँग टर्मसाठी असे अनेक फंड आहेत ज्यांनी 12 टक्के किंवा त्याहून अधिक वार्षिक परतावा दिला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT