Things You Should Know About Loans 
अर्थविश्व

कर्ज घेताय? मग त्याआधी स्वतःला विचारा 'हे' प्रश्न

साकेत गोडबोले (चार्टर्ड अकाउंटंट)

कर्ज घेताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. लोन घेताना पुढील काही प्रश्न स्वतःला आधी विचाराने आवश्यक आहे. 

1. आपल्याला खरोखरच पैशाची गरज आहे का ?
सध्या 'इन्स्टंट लोन' मिळत असल्याने बऱ्याचदा घराज नसताना कर्ज घेतले जाते. त्यामुळे अत्यावश्यक नसलेल्या बाबींसाठी कर्ज घेतले जाते. ते योग्य नाही. 
उदा. दागिन्यांसाठी कर्ज घेणे, एक गाडी असताना दुसरी आणखी एक गाडी घेणे. 

2. कर्ज आपल्याला परवडणारे आहे का ?
कर्जाची एकूण रक्कम, व्याज आणि त्यासाठीचा हप्ता (ईएमआय) आपल्याला परवडणारे आहेत का याचा आधी हिशोब केला पाहिजे. (हफ्ते आपल्या मासिक उत्पन्नाच्या 30 टक्क्यांहून कमी असावेत म्हणजे भविष्यासाठी बचत करता येते)

बिझनेस क्षेत्रातील इतर घाडमोडी आणि लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा

3. कर्ज उत्पादित आहे का ?
कर्ज घेऊन भविष्यात त्यातून उत्पन्न मिळणार असेल तर कर्ज घेणे योग्य असते. 
उदा. रिअल इस्टेटतील गुंतवणूक जी भविष्यात उत्पन्न मिळवून देणार असेल आणि कर्जाचा हफ्ता त्यातून मिळणाऱ्या मासिक उत्पन्नापेक्षा कमी असेल.
शिक्षणासाठी घेतलेले कर्ज, ज्यातून मुले चांगले शिक्षण घेऊन भविष्यात आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होतील.

साधारण किती कर्ज घ्यावे?
1. तुमच्या कर्जाचे हफ्ते हा तुमच्या मासिक मिळकतीच्या 30 टक्क्यांहून कमी असावे. हे सूत्र पाळल्यास तुम्हाला घर खर्च, बचतआणि गुंतवणुकीसाठी पैसे शिल्लक राहतील. 

2. कमीत कमी कर्ज घ्यावे - मोठ्या पगाराची नोकरी असली म्हणून जास्त कर्ज घेणे टाळावे.

बिझनेस क्षेत्रातील इतर घाडमोडी आणि लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा

"डिडरोट इफेक्ट" (Diderot effect) म्हणजे आपण एखादी वस्तू खरेदी केली की त्या वस्तूशी निगडित अजून एखादी वासाठी खरेदी करतो. 
उदाहरणार्थ -  घर घेतले की फर्निचर घेणे, नवीन ब्लेझर घेतला की शूज घेणे.

यामुळे आपला पगार जास्त असला तरी खर्च वाढतो आणि ठो भागविण्यासाठी कर्ज घेतले जाते.

गृहकर्जाचा हफ्ता +  कारसाठीचा हफ्ता + क्रेडिट कार्डचे कर्ज + इतर हफ्ता
मासिक मिळकतीच्या 30 टक्के किंवा कमी.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT