shares google
अर्थविश्व

Shares : केवळ 2 वर्षात 42 पट वाढला हा शेअर, तुमच्याकडे आहे का ?

बीएसईवरील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, दिग्गज गुंतवणुकदार डॉली खन्ना यांच्याकडे या कंपनीत 1.83 टक्के हिस्सा आहे.

नमिता धुरी

मुंबई : टीना रबर आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्सनी गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना तगडा परतावा दिला आहे. याचा अर्थ असा की गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांचे भांडवल 42 पटीने वाढले आहे.

गेल्या ट्रेडिंग आठवड्यात, शुक्रवारी 633.70 रुपयांवर अप्पर सर्किट लागले होते आणि गुरुवारीही अप्पर सर्किटला स्पर्श केला होता. बीएसईवरील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, दिग्गज गुंतवणुकदार डॉली खन्ना यांच्याकडे या कंपनीत 1.83 टक्के हिस्सा आहे. (Tinna Rubber and Infrastructure)

दोन वर्षांपूर्वी 11 सप्टेंबर 2020 रोजी बीएसईवर टीना रबरचे शेअर्स (Tinna Rubber and Infrastructure) 14.65 रुपयांवर होते. मागच्या शुक्रवारी तो बीएसईवर 618.90 रुपयांवर बंद झाला आहे. म्हणजेच केवळ दोन वर्षांत टीना रबरने गुंतवणूकदारांच्या भांडवलात 42 पट वाढ केली आहे.

जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते आतापर्यंत 42 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. या वर्षाच्या सुरुवातीलाही त्यांनी गुंतवणूक केली असती तर भांडवल 237 टक्क्यांनी वाढले असते. 1 सप्टेंबर रोजी तो 725.80 रुपयांवर होता आणि त्याने 52 आठवड्यांचा विक्रमी उच्चांक गाठला.

वापरलेल्या टायर्सपासून व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट तयार करत असल्याचे टीना रबर आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या वेबसाइटवर दिले आहे. ते या टायर्सपासून रबर भुसा आणि स्टील वायर तयार करतात.

कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, स्टॉक एक्सचेंजने दिलेल्या माहितीनुसार, जून 2022 च्या तिमाहीत स्वतंत्र नफा वाढला (Standalone Proffit) आहे. जून 2022 च्या तिमाहीत कंपनीने 60.29 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, जो एका तिमाहीपूर्वी 46.95 लाख रुपये होता.

एका वर्षापूर्वी याच कालावधीत हा नफा 36.94 लाख रुपये होता. जून 2022 च्या तिमाहीत कंपनीचा महसूल मार्च 2022 मधील 6.40 कोटी रुपयांच्या तुलनेत 8.21 कोटी रुपये होता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT