shares google
अर्थविश्व

या शेअरने 1 लाखाचे केले 93 लाख, आता 400% डिव्हिडेंड देण्याची घोषणा...

त्यांच्या उत्पादनांत बोरोप्लस, नवरत्न, फेअर अँड हँडसम, झंडू बाम, मेन्थो प्लस बाम, फास्ट रिलीफ आणि केश किंग यासह अनेक मोठे ब्रँड येतात.

नमिता धुरी

मुंबई : एफएमसीजी कंपनी इमामी लिमिटेडने (Emami Limited) जुलै-सप्टेंबर 2022 तिमाही निकालांसह त्यांच्या शेयरहोल्डर्ससाठी 400 टक्के डिव्हिडेंड जाहीर केला आहे. हा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे.

20,511 कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेली इमामी लिमिटेड ही एफएमसीजी उद्योगातील लार्जकॅप कंपनी आहे. इमामी लिमिटेडचे ब्रांड्स घराघरात पोहोचले आहेत. त्यांच्या उत्पादनांत बोरोप्लस, नवरत्न, फेअर अँड हँडसम, झंडू बाम, मेन्थो प्लस बाम, फास्ट रिलीफ आणि केश किंग यासह अनेक मोठे ब्रँड येतात.

1 लाखाचे 93 लाख

इमामी लिमिटेडचे शेअर्स 15 नोव्हेंबर 2002 रोजी बीएसईवर लिस्ट झाले होते, त्यावेळी त्याची किंमत 5 रुपये होती, जी आता 11 नोव्हेंबर 2022 रोजी 464.35 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच, एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी इमामीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची रक्कम 92.87 लाख रुपये झाली असती.

मात्र, गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आलेत. इमामीच्या स्टॉकमध्ये एका वर्षात 13 टक्के, 2022 मध्ये 11 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, सहा महिन्यांत या शेअरमध्ये सहा टक्क्यांची वाढ झाली आहे.

डिव्हिडेंडची घोषणा

बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने 11 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत 400 टक्के डिव्हिडेंडची घोषणा केली आहे, म्हणजे 1 रुपया फेस व्हॅल्यूचे प्रति इक्विटी शेअरसाठी 4 रुपये प्रती शेअर डिव्हिडेंड देण्याची घोषणा केली आहे. यासाठी 21 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.

तिमाही निकाल

कंपनीने सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत 807.36 कोटी रुपयांच्या नेट सेल्स वार्षिक 3.9 टक्के वाढ नोंदवली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 777.1 कोटी होती. पण, कंपनीचा एबिटजा 29.5 टक्क्यांनी घसरून 195.38 कोटी रुपये झाला. इमामी लिमिटेडचा नेट प्रॉफिट 184.18 कोटी रुपयांवर राहिला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT