tata group sakal
अर्थविश्व

Tata Group च्या 'या' शेअरने सात पट नफा, आणखी होणार तेजी

केवळ 2 वर्षात या शेअरने गुंतवणुकदारांचे पैसे सात पटीने वाढवले.

सकाळ डिजिटल टीम

कोरोना काळात शेअर बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली. पण या काळातही काही शेअर्सने गुंतवणुकदारांना चांगली कमाई करुन दिली आहे, असाच एक शेअर म्हणजे टाटा ग्रुपचा टाटा पॉवर (Tata Power) हा शेअर. केवळ 2 वर्षात या शेअरने गुंतवणुकदारांचे पैसे सात पटीने वाढवले.

टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये आणखी तेजी येण्याचे संकेत बाजार तज्ज्ञांच्या वर्तवले आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज आयसीआयसीआय सिक्युरिटीजने ऑगस्टमध्ये टाटा पॉवरच्या शेअरसाठी 262 रुपयांचे टारगेट निश्चित केले होते. सध्या त्याची बीएसईवर 219 रुपये किंमत आहे.

टाटा पॉवरने 2023-27 या आर्थिक वर्षासाठी हरित ऊर्जेवर (Green Energy) आपले लक्ष केंद्रित केले आहे. कंपनी 1 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च करणार आहे आणि त्यातील 80 टक्के गुंतवणूक हरित व्यवसायात केली जाईल. याद्वारे, कंपनीने आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत आपला महसूल 3 पट आणि निव्वळ नफा 4 पट वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 42.6 हजार कोटी रुपये आणि निव्वळ नफा 2.3 हजार कोटी रुपये होता.

5 वर्षात ग्रीन बिझनेस टरगेट व्यतिरिक्त, कंपनीचे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन स्पेसमध्ये आपले स्थान आणखी मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच देशांतर्गत ब्रोकरेज फर्मने यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

टाटा पॉवरचे शेअर्स मागच्या वर्षी 4 ऑक्टोबर 2021 ला 164 रुपयांवर होते, जे एका वर्षातला विक्रमी नीचांक आहे. पण मग यात पुन्हा तेजी दिसायला लागली आणि हा शेअर 7 एप्रिलला 298 रुपयांवर पोहोचला, जो 52 आठवड्यांचा विक्रमी उच्चांक आहे. सध्या हा शेअर 36 टक्के सवलतीवर उपलब्ध आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT