file photo
file photo 
अर्थविश्व

रिझर्व्ह बॅंकेवर आता सोनेविक्रीची वेळ!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आर्थिक आणीबाणीच्या प्रसंगी शेवटचा आणि भरवशाचा पर्याय ठरणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेकडील (आरबीआय) सुवर्णसाठा आता विक्रीला काढण्यात आला आहे. रिझर्व्ह बॅंकेने जुलैपासून बाजारात १.१५ अब्ज डॉलर सोनेविक्री केली आहे. मात्र याच काळात बॅंकेने ५.१ अब्ज डॉलरचे सोने खरेदी केले असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. सोनेखरेदी विक्रीच्या तुलनेत जास्त असली, तरी दीर्घ कालावधीनंतर ‘आरबीआय’वर सोनेविक्रीची वेळ का आली, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
देशाच्या परकी गंगाजळीत ११ ऑक्‍टोबरअखेर २६.७ अब्ज डॉलर इतक्‍या मूल्याचा सुवर्णसाठा आहे. ऑगस्टअखेर रिझर्व्ह बॅंकेकडे १९.८७ दशलक्ष ट्रॉय औंस सोने आहे. रिझर्व्ह बॅंकेकडील राखीव निधीबाबत माजी गव्हर्नर विमल जालान समितीने सरकारला अहवाल सादर केला होता. त्यात बॅंकेकडे ताळेबंदाच्या तुलनेत ५.५ टक्के ते ६.५ टक्‍क्‍याच्या दरम्यान राखीव निधी असावा, उर्वरित निधी सरकारला हस्तांतरित करण्यात यावा, अशी शिफारस केली आहे. या अहवालानंतर रिझर्व्ह बॅंकेचा सोने सौद्यांमधील सहभाग वाढल्याचे दिसून आले आहे. परकीय गंगाजळीतील शिल्लक साठ्यापैकी काही सोने महिन्यातून एकदा विक्री करण्यास परवानगी आहे. त्यामुळे बॅंकेकडून सोनेविक्रीचा प्रयत्न झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान, परकीय चलन विनियम व्यवहारांच्या दृष्टीने ‘आरबीआय’ जागतिक बाजारात सोने खरेदी-विक्री करत असल्याची शक्‍यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.


१९९१ प्रथमच सोने विक्रीची वेळ
१९९१ मध्ये आर्थिक समतोल ढासळल्याने आयात बिले थकली होती. आयातीची देणी चुकती करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने युनियन बॅंक ऑफ स्वित्झर्लंड आणि बॅंक ऑफ इंग्लंड या दोन बॅंकांकडे ६७ टन सोने गहाण ठेवले होते.

वित्तीय तूट कमी करण्याचा प्रयत्न
मंदीच्या प्रभावाने कर संकलनातील तूट भरून काढण्यासाठी नुकतेच रिझर्व्ह बॅंकेने जालान समितीच्या शिफारशींनुसार राखीव निधीतील १.७६ लाख कोटी केंद्र सरकारला सुपूर्द केले होते. देशांतर्गत मंदीने सरकारच्या महसूलप्राप्तीला फटका बसला आहे. त्यामुळे यंदा वित्तीय तूट वाढण्याची शक्‍यता आहे. ही तूट कमी करण्यासाठी सरकारने रिझर्व्ह बॅंकेकडे घसघशीत लाभांशाची अपेक्षा व्यक्‍त केली आहे. मात्र सध्या बॅंकेकडून सुरू असलेली सोनेविक्री कोणासाठी केली जात आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र विक्रीबाबत बॅंकेने कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT