shares google
अर्थविश्व

टिमकेन इंडियाच्या शेअर्समध्ये 20% तेजी, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक...

टिमकेन भारतात जास्तीत जास्त क्षमतेने कार्यरत आहे. सध्या कंपनी भारतात SRB आणि CRB तयार करत नाही.

नमिता धुरी

मुंबई : टिमकेन इंडियाचे (Timken India) शेअर्स गुरुवारी बीएसई इंट्राडेवर 20 टक्क्यांच्या वाढीसह 3,490 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. स्फेरिकल रोलर बेअरिंग्ज (SRB), सिलिंड्रीकल रोलर बेअरिंग्स (CRB) आणि इतर घटकांच्या निर्मितीसाठी भरूच, गुजरातमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्याची कंपनीची योजना आहे.

या बातमीमुळे टिमकेन इंडियाच्या शेअर्समुळे मोठी खरेदी दिसून आली. असेही गेल्या सहा महिन्यांत या शेअरमध्ये 85 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, या वर्षी म्हणजे 2022 मध्ये हा स्टॉक 72 टक्के आणि एका वर्षात 77 टक्क्यांनी वाढला आहे. हेही वाचा - महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

या प्लांटसाठीचे कमर्शियल प्रॉडक्शन जानेवारी 2025 पासून सुरू होण्याची अंदाज असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले. भरूच मधील सध्या सुरु असलेला प्लांट प्रामुख्याने टॅपर्ड रोलर बेअरिंग्ज (TRBs) आणि त्याचे घटक तयार करतो. पण नव्या प्लांटमध्ये SRB, CRB आणि घटक तयार केले जातील, ज्यामुळे कंपनीची उत्पादन क्षमता वाढेल.

टिमकेन भारतात जास्तीत जास्त क्षमतेने कार्यरत आहे. सध्या कंपनी भारतात SRB आणि CRB तयार करत नाही. SRBs आणि CRBs जगभरातील टिमकेन ग्रुप कंपन्यांकडून आयात केले जातात आणि भारतात विकले जातात.

SRB आणि CRB ची भारतामध्ये चांगली बाजारपेठ असल्याने टिमकेनचे एबीटदा मार्जिन सुधारण्यास मदत होईल असा विश्वास आयसीआयसीआय सिक्युरिटीजला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israeli Woman Assault : पर्यटनासाठी आलेल्या इस्रायली महिलेसह दोघींवर सामूहिक अत्याचार; दोषी ठरलेल्या तिघांना फाशी, काय आहे प्रकरण?

Fergusson College Road Clash: क्षणात पेटला वाद, पुढच्याच मिनिटाला दोन गटात मारामारी! एफसी रोडवरील थरार CCTV मध्ये कैद!

महादेव मुंडे हत्या प्रकरणात आज दोघांची नार्को टेस्ट, वाल्मिक कराडच्या घरी होते कामाला; गूढ उलगडणार?

Valentine's Day 2026: व्हॅलेंटाईनला फुलांपेक्षा कंडोमची विक्री जास्त! 'हे' शहर आघाडीवर, भारतात नवा ट्रेंड

Ahilyanagar leopard: घरात घुसला अन् बाथरूममध्ये फसला; भिंगारमधील सौरभनगर परिसरात बिबट्या अखेर जेरबंद, बिबट्या आल्याने पळापळी!

SCROLL FOR NEXT