Tik-Tok 
अर्थविश्व

अमेरिकेतही ‘टिक टॉक’ बंद; ट्रम्प यांचा निर्णय

पीटीआय

वॉशिंग्टन - टिक टॉक ॲपवर अमेरिकेत बंदी घालणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज जाहीर केले. या ॲपचा वापर चीनकडून हेरगिरी करण्यासाठी होत असल्याची शंका व्यक्त झाल्यानंतर ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.

भारताने टिक टॉक या चिनी ॲपवर बंदी घातल्यानंतरच अमेरिकेतही अशी मागणी होत होती. अध्यक्ष ट्रम्प यांनी या ॲपवर थेट बंदीच घालणार असल्याचे आज जाहीर केले. अध्यक्षीय अधिकार वापरून लवकरच ही बंदी अमलात आणणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे कदाचित उद्याच ही बंदी घातली जाऊ शकते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, ‘ॲपल’ कंपनीने त्यांच्या चिनी ॲप स्टोअरवरून २९, ८०० ॲप हटविले असून त्यात २६००० हून अधिक गेमचा समावेश आहे. 

मायक्रोसॉफ्ट घेणार ताबा
‘मायक्रोसॉफ्ट’ कडून टिकटॉक चालवण्याबाबत विचार केला जात आहे. वॉल स्ट्रिट जर्नलच्या वृत्तानुसार, टिकटॉकचे अमेरिकेतील कामकाज पाहण्याबाबत मायक्रोसॉफ्ट विचार करत आहे. येत्या सोमवारपर्यंत मायक्रोसॉफ्ट-टिकटॉक यांच्यात करार होऊ शकतो. या वेळी मायक्रोसॉफ्ट, बाइटडान्स आणि व्हॉइट हाउसचे प्रतिनिधी सहभागी होऊ शकतात. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : गोकुळमधील अदृष्य शक्तीला पुन्हा दणका, ४९२ दूध संस्थांना मतदानाचा अधिकार कायम

SCROLL FOR NEXT