Share Market
Share Market Sakal
अर्थविश्व

सोमवारी निफ्टी 17,400 च्या खाली घसरला, आजची बाजाराची स्थिती?

शिल्पा गुजर

आठवड्याची सुरूवात बाजारातील घसरणीने झाली. सुरुवातीच्या तेजीनंतर नफा वसुलीने बाजार पडला. सेन्सेक्स 503 आणि निफ्टी 143 अंकांनी घसरले. आयटी वगळता सर्व क्षेत्र निर्देशांकात विक्री दिसून आली. ऑइल-गॅस, रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. दिग्गजांप्रमाणेच मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्सनी सपाटून मार खाल्ला.

सोमवारी सेन्सेक्स 503.25 अंकांनी अर्थात 0.86 टक्क्यांनी घसरून 58,283.42 वर बंद झाला, तर निफ्टी 143.05 अंकांनी अर्थात 0.82 टक्क्यांनी घसरून 17,368.25 वर बंद झाला. लघु आणि मध्यम शेअर्सनाही फटका बसला. मिडकॅप 77 अंकांनी घसरून 31,126 वर बंद झाला आहे.

सेन्सेक्सच्या 30 पैकी 22 शेअर्सनी विक्री दिसून आली. तर निफ्टीचे 50 पैकी 36 शेअर्स घसरले. दुसरीकडे, निफ्टी बँकेच्या 12 पैकी 9 शेअर्समध्ये विक्री दिसून आली.

तांत्रिक दृष्टीकोन

निफ्टीने डेली स्केलवर बियरिश engulfing कँडल तयार केली आणि 2 दिवसांची तेजी गमावली असे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. निफ्टीला 17,600-17,777 या पातळीपर्यंत जाण्यासाठी 17350 च्या वरच राहावे लागेल, तर खाली 17,200 -17100 च्या झोनमध्ये सपोर्ट दिसत असल्याचे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले.

बाजारात आज कशी स्थिती असेल ?

निफ्टीने डेली चार्टवर पॉप गन पॅटर्न तयार केला आहे. ज्यासाठी 17639 हा सोमवारचा रझिस्टेंस ठरला असे BNP परिबाचे गौरव रत्नपारखी म्हणाले. मोठ्या तेजी पूर्वी कंसोलिडेशन सुरू राहील असेही ते म्हणाले.

निफ्टीसाठी 17500 वर रझिस्टेंस दिसून येत असल्याचे दीनदयाल इन्व्हेस्टमेंट्सचे मनीष हथिरामानी म्हणाले. तेजी मिळविण्यासाठी निफ्टीला 17500 च्या वर बंद होणे आवश्यक आहे. दुसरीकडे, जर निफ्टी 17300 ची पातळी गाठत असेल तर आपण त्यात आणखी घसरण पाहू शकतो आणि निफ्टी 17000 च्या दिशेने जाऊ शकतो अशी माहितीही त्यांनी दिली.

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

ॲक्सिस बँक (AXISBANK)

टेक महिंद्रा (TECHM)

एसबीआय लाईफ (SBILIFE)

विप्रो (WIPRO)

हिंदाल्को (HINDALCO)

आरती इंडस्ट्रीज (AARTIND)

एनआयआयटी टेक्नोलॉजीज (COFORGE)

एम फॅसिस (MPHASIS)

कमिंस इंडिया (CUMMINSIND)

एल. अँड टी. टेक्नोलॉजी सर्विसेस लिमिटेड (LTTS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT