Uday Kotak Sakal
अर्थविश्व

शहरी-ग्रामीण दरी पुसल्याने डिजिटल संधी

गेल्या तीस वर्षांमध्ये अनेक सरकारे बदलली असली, तरी आपली सुधारणांची प्रक्रिया मात्र अव्याहतपणे सुरू राहिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

देशातील डिजिटल क्रांतीमुळे भारतातल्या कोणत्याही भागातील व्यक्ती जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात सेवा पुरवू शकते. ही भारतासाठी खूप मोठी संधी आहे. फक्त एवढेच नव्हे, तर खुद्द भारतातही अर्बन इंडिया आणि ग्रामीण भारत यांच्यातली दरी पुसून गेली आहे आणि त्यामुळे संतुलन साधण्यासही मदत झाली आहे.

गेल्या तीस वर्षांमध्ये अनेक सरकारे बदलली असली, तरी आपली सुधारणांची प्रक्रिया मात्र अव्याहतपणे सुरू राहिली आहे. भारत खूप मोठ्या मार्गावरून पुढे आला आहे. आता, कोविड-१९च्या साथीने आपल्यापुढे नवीन आव्हाने आणि संधीदेखील उभ्या केल्या आहेत. साथीमुळे केवळ एका वर्षातच आपण पाच वर्षांनी पुढे गेलो आहोत. इतर क्रांतींबरोबर आधारमुळे डिजिटल क्रांती झाली आहे. ती कायम राहणार आहे आणि तिच्यामुळे भारताला एक खूप मोठी बाजारपेठ संधी मिळाली आहे, जिचा वापर करून अनेक गोष्टी साध्य करून घेता येऊ शकतात.

एक सगळ्यांत मोठा बदल झाला आहे, तो म्हणजे भूगोल ही गोष्ट आता इतिहासजमा झाली आहे. डिजिटल क्रांतीमुळे हे साध्य झाले आहे. त्यामुळे भारतातल्या कोणत्याही भागातील व्यक्ती जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात सेवा पुरवू शकते. ही भारतासाठी खूप मोठी संधी आहे. फक्त एवढेच नव्हे, तर खुद्द भारतातही अर्बन इंडिया आणि ग्रामीण भारत यांच्यातली दरी पुसून गेली आहे आणि त्यामुळे संतुलन साधण्यासही मदत झाली आहे.

अर्थात, एकीकडे या यशकथांची चर्चा करत असताना, अनेक क्षेत्र अशीही आहेत, ज्यांच्यावर आपल्याला दीर्घकालीन दृष्टिकोनातून भर द्यायला पाहिजे. यात समावेश आहे तो आरोग्य, शिक्षण आणि शाश्वत विकास या क्षेत्रांचा. तातडीच्या आवश्यकतांचा विचार केला, तर आपण लसीकरण अधिक वेगाने करण्याची आवश्यकता आहे आणि साथीची तिसरी लाट आल्यास तिचा सामना करण्याच्या दृष्टीने अधिक क्षमता विकसित करण्याचीही गरज आहे.

आपल्याला लाखो भारतीयांसाठी रोजगारसंधीही निर्माण करायला हव्यात. कोविड-१९ने अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे, त्याच वेळी डिजिटलमुळे इतर काही क्षेत्रांत नव्याने संधी तयारही झाल्या आहेत. प्रशिक्षण आणि फेरकौशल्य प्रशिक्षण या दोन गोष्टींनी आपल्या या दोन्हींतली दरी सांधता येईल. आज आपण २०२१मध्ये असताना भारत एका निर्णायक वळणावर आला आहे. आपण सध्या आवश्यक असलेल्या व्यापक गोष्टींवर भर द्यायला पाहिजे आणि त्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने केली पाहिजे. हे केले तर भारत लखलखीत स्थान मिळवेल यात शंकाच नाही.

- उदय कोटक, व्यवस्थापकीय संचालक व सीईओ, कोटक महिंद्रा बॅंक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT