Jobs 
अर्थविश्व

बेरोजगारीचा आलेख फेब्रुवारीमध्ये चढता

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशातील बेरोजगारीचे प्रमाण दरमहा वाढत असून, तरुणांना रोजगार देण्यास सरकारला अपयश आल्याचे समोर येत आहे.‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी‘ (सीएमआयई) या संस्थेच्या ताज्या अहवालानुसार फेब्रुवारी महिन्यात बेरोजगारीचे प्रमाण ७.२ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे. गेल्या अडीच वर्षांतील बेरोजगारीचे हे सर्वाधिक प्रमाण आहे.

निवडणुकीच्या तोंडावर बेरोजगारीची ताजी आकडेवारी सरकारची डोकेदुखी वाढविण्याची शक्‍यता आहे. 

नोकऱ्या कमी होत असल्याने श्रमशक्तीवर परिणाम झाला आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये बेरोजगारीचे प्रमाण ५.९ टक्के होते. यंदा फेब्रुवारी महिन्यात जवळपास ४० कोटी नोकऱ्या असल्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ४० कोटी ६० लाख नोकऱ्या अस्तित्वात असल्याचे ‘सीएमआयई’ने म्हटले आहे. या अहवालासाठी देशभरातील दहा हजारांहून अधिक घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. ‘सीएमआयई’च्या जानेवारी महिन्यातील अहवालानुसार गेल्या वर्षभरात तब्बल एक कोटी नऊ लाख कामगारांनी नोकरी गमावली होती. याचा सर्वांत मोठा फटका ग्रामीण भारताला बसला असून, तेथे झपाट्याने बेरोजगारी वाढत असल्याबद्दल ‘सीएमआयई‘ने चिंता व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Kumbh Mela : २०२७ चा कुंभमेळा महाराष्ट्राचे 'ब्रँडिंग'! मुख्य सचिव राजेशकुमार यांचे सूक्ष्म नियोजन आणि विकासकामांना गती देण्याचे निर्देश

Daulat Sugar Factory : दौलत-अथर्व कामगार प्रश्नातून हलकर्णीत दोघांना बेदम मारहाण, 'स्वाभिमानी'च्या माजी तालुकाध्यक्षांची कार फोडली

Latest Marathi Breaking News Live: मातोश्री परिसरात ड्रोनमुळे खळबळ!

IND vs AUS, Video: T20I मालिका विजयानंतर कसं होतं भारताच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण, 'या' खेळाडूने जिंकलं Impact Player मेडल

Phone Tips: फोन 100 % चार्ज करण्याची सवय ठरु शकते घातक, जाणून घ्या तोटे

SCROLL FOR NEXT