nirmala sitharaman sakal media
अर्थविश्व

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २ टप्प्यात; ३१ जानेवारीपासून सुरुवात

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली - संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) ३१ जानेवारीपासून सुरु होणार आहे. याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. ३१ जानेवारी ते ८ एप्रिल या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडेल. दोन टप्प्यात हे अधिवेशन असणार आहे. देशात (India) फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर केंद्र सरकार काय घोषणा करणार याकडे लक्ष लागून राहणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत असणार आहे. तर दुसरा भाग १४ मार्च ते ८ एप्रिल या काळात असेल. संसदेत १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सितारमण अंर्थसंकल्प मांडतील.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थित आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कऱण्यास सांगितलं आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे अर्थंसंकल्पीय अधिवेशनावर टांगती तलवार होती. काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काही दिवसांपूर्वीच संसद भवनाची पाहणी करून आढावा घेतला होता. संसद भवनातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच अनेक नेत्यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली असल्यानं अधिवेशनाबाबत सांशकता व्यक्त केला जात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

Marathi Cinema : शरद गोरे यांच्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभर डंका

T20 WC, IND vs PAK: '२४ तास थांबा, त्यानंतर...', सूर्यकुमार यादव पाकिस्तानसोबत हँडशेक करण्याबाबत काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT