SIP Sakal
अर्थविश्व

पाच वर्षांत ३ लाखांचे झाले १० लाख; लॉन्गटर्म SIP साठी 'इथे' कराल गुंतवणूक

सुमित बागुल

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा SIP हा सर्वात चांगला मार्ग आहे.

सर्वसाधारणपणे आपण सर्वांनी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan) म्हणजे SIP बद्दल ऐकलंय. अनेकजण यामार्फत म्युच्युअल फंडात गुंतवणूक देखील करतात. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा SIP हा सर्वात चांगला मार्ग आहे. तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असल्यास सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP (Systematic Investment Plan) तयार करून तुम्ही अगदी पाचशे ते हजार रुपये प्रत्येक महिन्याला म्युच्युअल फंडात गुंतवू शकतात. जास्त अवधीसाठी तुम्ही गुंतवणूक करत राहिलात तर तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो.

थेट शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंडात (Mutual Fund) कमी जोखीम असल्याचे तज्ज्ञ सांगतात. जाणून घेऊयात असे प्लॅन्स ज्यांनी दिला बंपर परतावा. बाजारात असे अनेक प्लॅन्स आहेत ज्यांनी 5 वर्षातच 15 टक्क्यांपासून अगदी 25 टक्क्यांपर्यंत बंपर रिटर्स दिले आहेत. मीडिया रिपोर्ट मधील व्हॅल्यू रिपोर्टवर आधारित एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलंय की PGIM इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटी फंड, कोटक स्मॉलकॅप फंड यामधून गुंतवणूकदारांनी जबरदस्त परतावा मिळवला आहे.

PGIM इंडिया मिडकॅप ऑपॉर्च्युनिटी फंडमधून मागील पाच वर्षात 25 टक्के परतावा दिलाय. म्हणजेच पाच वर्षात जर तुम्ही तीन लाख रुपये गुंतवले असते तर त्याची किंमत वाढून आता ११ लाख रुपये इतकी झाली आहे.

तर दुरीकडे कोटक स्मॉलकॅप फंड ने गेल्या पाच वर्षात 23 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा आपल्या गुंतवणूकदारांना दिला आहे. म्हणजेच पाच वर्षात जर तुम्ही तीन लाख रुपये गुंतवले असते तर त्याची किंमत वाढून आता 10.54 लाख रुपये इतकी असती.

याचप्रकारे मीराइ असेट इमर्जिंग ब्लूचिप ने मागील पाच वर्षात 23 टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच पाच वर्षात जर तुम्ही तीन लाख रुपये गुंतवले असते तर त्याची किंमत वाढून आता 10.57 लाख रुपये इतकी असती.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करून गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT