Freelancers  esakal
अर्थविश्व

तुम्ही Freelancers आहात? जाणून घ्या फ्रीलांसर्सचे टॅक्स नियम

तुम्ही फ्रीलांसर आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

शिल्पा गुजर

तुम्ही फ्रीलांसर आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

तुम्ही फ्रीलांसर (Freelancers) आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण फ्रीलांसर्सही टॅक्सच्या कक्षेत येतात. फ्रीलांसर्सना कसला आलाय टॅक्स (Tax) असा विचार करु नका आणि ही बातमी वाचा. फ्रीलांसर्सच्या कमाईवर लागू होणारे कर नियम जाणून घेऊयात.

सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे फ्रीलांसरला आयकर रिटर्न (ITR) भरण्यासाठी केवळ ITR-3 किंवा ITR-4 निवडता येते.

तुमची नोकरी (Job) असताना एखाद्या आर्थिक वर्षात नोकरीच्या बाहेर फ्रीलान्सिंगमधून काही कमाई केली असेल तेव्हा त्याला/तिला व्यवसाय किंवा व्यवसायातून उत्पन्न असलेल्यांसाठी पात्र असलेल्या ITR फॉर्मची निवड करावी लागेल.

व्यवसायासारखेच, फ्रीलान्स काम करणाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नातून स्वतंत्र काम करण्यासाठी केलेले खर्च वजा करण्याचा पर्याय असतो. या वजावटीच्या खर्चात तुम्ही काम करण्यासाठी घेतलेल्या जागेचे भाडे आणि त्यावरील कोणताही दुरुस्तीचा खर्च, काम करण्यासाठी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती, ऑफीसमध्ये होणारा खर्च जसे की खरेदीचा पुरवठा (purchasing supplies), इंटरनेट बिले आणि फोन बिले, कामासाठी केलेल्या प्रवासाशी संबंधित खर्च (travel expenses) यांचा समावेश आहे.

फ्रीलांसरना ITR दाखल करताना 50,000 रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा दावा करता येत नाही. पण, जर एखाद्या आर्थिक वर्षात तुम्ही नोकरी केली असेल आणि फ्रीलान्स कामही केले असेल, तर तुम्ही पगाराच्या उत्पन्नावर स्टँडर्ड डिडक्शनचा दावा करू शकता. बहुतेक एम्प्लॉयर्स फ्रीलांसरना केलेल्या पेमेंटवर TDS कापतात हे लक्षात असू द्या. फ्रीलान्स उत्पन्न असलेल्यांना प्रत्येक तिमाहीत ऍडव्हान्स टॅक्सेबल रक्कम भरावी लागते, ज्यांची करपात्र रक्कम (taxable amount) 10,000 रुपयांपेक्षा जास्त असते. जर तुम्ही कॅलक्युलेट केलेला एकूण कर 10,000 रुपयांच्या वर आला तर तुम्हाला आयकर कायद्यानुसार त्यावर व्याज द्यावे लागते हे लक्षात असू द्या.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT