Inflation sakal
अर्थविश्व

Inflation : सर्वसामान्यांना दिलासा! घाऊक महागाईचा दर १२.९६ टक्क्यांवर

जानेवारी २०२२ मधील महागाईच्या दरात घट झाली असून नोव्हेंबर २०२१ मध्ये तो १४.८७ टक्क्यांवर होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशातील नागरिकांना महागाईतून (Inflation) काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण घाऊक महागाईच्या (Wholesale Inflation) दरात जानेवारी २०२२ मध्ये घट होऊन हा दर १२.९६ टक्क्यांवर पोहोचला. यामुळं गेल्या महिन्यात डिसेंबर २०२१ मध्ये हा आकडा १३.५६ टक्के होता. आर्थिक सल्लागारांच्या कार्यालयानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. (Wholesale inflation fell to 12.96 percent in January 2022)

दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाईचा दर उच्चस्तरावर पोहोचला होता. नोव्हेंबर २०२१ मध्ये १२ वर्षांचा विक्रम तोडत घाऊक महागाईचा दर १४.८७ टक्क्यांवर पोहोचला होता. पण महागाईचा दराचे आकडे गेल्या काही काळापासून सातत्यानं दोन आकडी राहिला आहे.

Inflation rate January 2022

गेल्यावर्षीच्या तुलनेत जानेवारी २०२२ मध्ये तेल, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, धातू, रसायने आणि रासायनिक पदार्थ तसेच अन्न पदार्थ यांच्या दरवाढीमुळं महागाईचा दर जास्त होता, असं जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma Health Update: अभिषेक संघासोबत स्टेडियममध्ये दिसला, पण का नाही खेळला? पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

जिनिलियाला पहिल्यांदा घरात पाहिल्यावर काय होती विलासराव देशमुखांची प्रतिक्रिया? रितेशने सांगितला तो प्रसंग

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी डोळ्यावर पट्टी बांधली का हे पाहावे लागेल - संदीप देशपांडे

Pune Cyber Fraud : पुण्यात आरटीओच्या बनावट चलनाद्वारे व्यावसायिकाची सायबर फसवणूक; तीन लाखांचा गंडा

T20 World Cup IND vs NAM : अभिषेक शर्मा मुकला, टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये केले दोन बदल; नामिबियाने टॉस जिंकून....

SCROLL FOR NEXT