Wipro CEO Abidali Neemuchwala steps down.jpg 
अर्थविश्व

विप्रोच्या 'सीईओ'पदावरून अबिदाली नीमुचवाला होणार पायउतार

पीटीआय

बंगळूर : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी विप्रो लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि  मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरून अबिदाली नीमुचवाला पायउतार होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कौटुंबिक कारणांमुळे नीमुचवाला राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती होईपर्यंत ते या पदावर कार्यरत राहतील.

1 फेब्रुवारी 2016 ला नीमुचवाला यांनी विप्रोच्या सीईओ पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्याअगोदर 2015 मध्ये ते विप्रोत सीओओ पदावर कार्यरत होते. विप्रोमध्ये कार्यरत होण्याअगोदर ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) वरिष्ठ पदावर नियुक्त होते. नीमुचवाला यांच्या कार्यकाळात कंपनीने मोठी प्रगती साधली असून इतर कंपन्यांच्या अधिग्रहणात आणि कंपनीचा डिजिटल व्यवसाय जगभरात विस्तारण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली असल्याचे विप्रोचे अध्यक्ष रिषद प्रेमजी यांनी म्हटले आहे. तसेच त्यांच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पन्नास वर्षीय नीमुचवाला हे आयआयटी बॉम्बेचे पदव्युत्तर स्नातक आहेत. त्यांच्याकडे औद्योगिक व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी असून एनआयटी-रायपूर येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन पदवीधर आहेत.

तिसऱ्या तिमाहीत विप्रोच्या एकत्रित महसुलात 2.73 टक्क्यांनी वाढ होऊन कंपनीचा महसूल 15,470 कोटींवर पोचला आहे. मात्र कंपनीच्या नफ्यात मात्र  गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.2 टक्क्यांनी घट नोंदविली गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४ वर्षात १११ खासदार-आमदारांचे पक्षांतर, सर्वाधिक इनकमिंग झालेला पक्ष भाजप नव्हे, भाजपात २९ जणांचा प्रवेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

Vastu Tips: पिंपळ, तुळस की मुख्य दार? पितृपक्षात संध्याकाळी का अन् कुठे लावावा दिवा? वास्तुनुसार जाणून घ्या योग्य दिशा अन् फायदे!

Pune Drought: पावसाअभावी भातपिके वाळू लागली; मुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक

Traditional Farming: ट्रॅक्टरच्या युगातही बैलजोडीचा ध्यास; २२ वर्षांच्या ‘राजा’नंतर खंडेराव बकाल यांनी पुन्हा जपला शेतीचा पारंपरिक वारसा

SCROLL FOR NEXT