LIC shares  
अर्थविश्व

गुंतवणूकदारांना बुडवण्यात LIC चा IPO आशियात ठरला नंबर वन

स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यापासून LIC चे बाजार मूल्य सुमारे 17 बिलियन डॉलरने कमी झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : बाजार मूल्यात 17 बिलियनच्या मोठ्या घसरणीमुळे भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC) या वर्षी आशियातील IPO मध्ये सर्वात मोठा तोटा झाला आहे. या घसरणीसह एलआयसीचा आयपीओ गुंतवणूकदारांचे पैसे बुडवण्याच्या बाबतीत संपूर्ण आशियातील प्रथम क्रमांकाचा आयपीओ बनला आहे. स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यापासून LIC चे बाजार मूल्य सुमारे 17 बिलियन डॉलरने कमी झाले आहे. त्यामुळे LIC चा IPO 2022 मध्ये आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणारा IPO बनला आहे. एलआयसीचा शेअर आयपीओच्या किंमतीपेक्षा 29 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

IPO किमतीपेक्षा 29 टक्क्यांनी घसरले शेअर्स

ब्लूमबर्गने तयार केलेल्या आकडेवारीनुसार, LIC चा IPO 17 मे रोजी सूचीबद्ध झाल्यापासून बाजार भांडवलात घट होण्यामध्ये आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. LIC चे मार्केट कॅप 29 टक्क्यांनी घसरले आहे. दुसरीकडे, दक्षिण कोरियाच्या एलजी एनर्जी सोल्युशन्सचा स्टॉक 30 टक्के कमी झाला आहे. त्यात आज शेअर 668 रुपयांवर बंद झाला. म्हणजेच एलआयसी आयपीओच्या इश्यू किंमतीपेक्षा 281 रुपये कमीची नोंद यामध्ये करण्यात आली आहे.

एलआयसीचा शेअर का पडला?

शेअर बाजारात मोठी घसरण होत असताना एलआयसीचे शेअर्सही विक्रमी अंकावर बंद झाले आहेत. LIC चा स्टॉक प्रथमच सुमारे 6 टक्क्यांनी घसरून 668.25 रुपयांवर बंद झाला. वास्तविक, LIC च्या IPO मध्ये गुंतवणूक केलेल्या अँकर गुंतवणूकदारांचा लॉक इन कालावधी आज संपला आहे. अँकर गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे एलआयसीच्या शेअरमध्ये इतकी मोठी घसरण झाली असल्याचे सांगितले जात आहे.

IPO मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना, विशेषतः किरकोळ गुंतवणूकदारांना 1.64 लाख कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. एलआयसीचे मार्केट कॅप 4.22 लाख कोटी रुपयांवर आले आहे. तर IPO किंमतीनुसार LIC चे बाजार भांडवल 6 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच लिस्टिंग झाल्यापासून गुंतवणूकदारांचे 1.78 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, 17 मे पासून 29 टक्क्यांनी कमी होऊन, बाजार भांडवलाच्या बाबतीत भारतातील हा आजपर्यंतचा दुसरा सर्वात मोठा IPO आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले ! मशि‍दीजवळ स्फोटात १५ ठार, ५० हून अधिक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

३ महिलांनी बनवली फिल्म, ६०-६० लाखांच्या बजेटपासून तब्बल ३०० कोटींची कमाई; अवघ्या ४१ दिवसांत 'या' सिनेमाने रचला मोठा विक्रम

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Garlic for High Cholesterol : सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल कमी होते का? NCBI संशोधनातून काय समोर आले?

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT