Nirmala Sitharaman Sakal
अर्थविश्व

WPI Inflation : महागाईपासून सामान्यांना दिलासा; 'या' क्षेत्रांना होणार फायदा

अन्नपदार्थ स्वस्त झाल्यामुळे घाऊक महागाई दरात घट झाली आहे

सकाळ डिजिटल टीम

Wholesale Price Index inflation : ऑक्टोबरमधील घाऊक महागाई दराचे आकडे आले आहेत आणि सप्टेंबरच्या तुलनेत महागाई कमी झाली आहे. ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाईचा दर 8.39 टक्क्यांवर आला आहे. महिन्या-दर-महिन्यानुसार त्यात घट झाली असून, यामुळे जनतेला सततच्या वाढत्या महागाईपासून दिलासा मिळाला आहे.

सप्टेंबर आणि ऑगस्टमध्ये घाऊक महागाई दर

सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दर 10.7 टक्के होता आणि मागील महिन्यात म्हणजेच ऑगस्टच्या 12.41 टक्क्यांच्या तुलनेत त्यात घट झाली. सप्टेंबरमध्ये आलेला डेटा सलग 18 व्या महिन्यात घाऊक महागाई दर दहा अंकांपेक्षा जास्त दर्शवत होता.

किरकोळ महागाईची आकडेवारीही आज संध्याकाळी जाहीर होणार असून, याकडे रिझर्व्ह बँकेसह, उद्योजक आणि बाजाराचेही डोळे लागले आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ऑक्टोबरमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 7 टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

'या' क्षेत्रात महागाई कमी झाली

अनेक क्षेत्रांतील महागाईच्या आकडेवारीत घट झाली आहे. उत्पादित उत्पादनांचा महागाई दर मागील महिन्यात 6.34 टक्क्यांवरून 4.42 टक्क्यांवर आला आहे. याशिवाय इंधन आणि उर्जा विभागाचा महागाई दरही गेल्या वेळी 32.61 टक्क्यांवरून 23.17 टक्क्यांवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT