अर्थविश्व

येस बँकेच्या शेअरची मोठी उसळी; ब्रोकरेज संस्थांचे 'बाय' रेटिंग

वृत्तसंस्था

मुंबई: रिझर्व्ह बँकेकडून येस बँकेच्या मालमत्ता गुणवत्ता आणि प्रोव्हिजनिंग बाबत 'नो ऍसेट क्वालिटी डायव्हर्जन्स'चा शेरा मिळाल्यानंतर आज सकाळी (गुरुवार) येस बँकेचा शेअर तब्बल 28.96 टक्क्यांनी वाढून 218 रुपयांवर पोचला होता. येस बँकेच्या इतिहासात 2005 नंतर प्रथमच एका दिवसात कंपनीच्या शेअरमध्ये एवढी मोठी उसळी आली आहे. 

गेल्याकाही दिवसांपासून बँकेसाठी मोठ्या रकमेच्या थकीत कर्जाबाबत (ऍसेट क्वालिटी डायव्हर्जन्स) मोठी समस्या निर्माण झाली होती. याच मुद्द्यावरून रिझर्व्ह बँकेने येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर यांना बँकेच्या व्यवस्थापकीय आणि सीईओ पदी मुदत वाढ देण्यास नकार दिला होता. त्यामुळे, चालू आर्थिक वर्षात बँकेचा शेअर तब्बल 39 टक्यांनी घसरला होता. 

बँकेने बुधवारी संध्याकाळी 2017-18 सालासाठीचा आरबीआयकडून प्राप्त 'रिस्क असेसमेंट' अहवाल जाहीर केला. त्यानंतर, बँकेच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उद्या पडल्याचे चित्र आहे. तर, काही ब्रोकरेज संस्थांनी येत्या काही दिवसात बँकेच्या शेअरमध्ये 80 टक्क्यांपर्यंतची वाढ पाहायला मिळण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. 

सध्या मुंबई शेअर बाजारात येस बँकेचा शेअर 41.45 रुपयांनी म्हणजेच 24.52 टक्क्यांनी वधारला असून तो  210.50 रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे 48,662.48 कोटींचे बाजारभांडवल आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT