yes bank scam builder sanjay chhabria got 14 judicial custudy by court  
अर्थविश्व

YES Bank Scam : बिल्डर संजय छाब्रिया यांना १४ दिवसांची कोठडी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : येस बँक, डीएचएफएल कर्ज फसवणूकीप्रकरणी बांधकाम व्यवसायिक संजय छाब्रियांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. डीएचएफएलकडून ६७८ कोटी बेहिशोबी कर्ज घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. (yes bank scam builder sanjay chhabria got 14 judicial custudy by court)

केंद्रीय तपास यंत्रणा (CBI) ने प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया यांना अटक केली होती. येस बँक-डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. संजय छाब्रिया हे रेडियस ग्रुपचे प्रवर्तक आहेत. 15 फेब्रुवारी रोजी सीबीआयने संजय छाब्रिया आणि त्यांच्या कंपनीच्या 15 ठिकाणांवर छापे टाकले होते, ज्यामध्ये या प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. संजय छाब्रिया तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा मार्च 2020 पासून या प्रकरणाचा तपास करत होती.

येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई आणि पुण्यासह रेडियस डेव्हलपर्सच्या 15 ठिकाणांवर छापे टाकले होते. सीबीआयने रेडियस ग्रुपचे संजय छाब्रिया यांच्या घराचीही झडती घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्याच्या माध्यमातून सीबीआय अशा लोकांवर कारवाई करत आहे ज्यांनी येस बँकेकडून कर्ज घेऊन कर्जाची परतफेड केली नाही. बँकेकडून दिलेले कर्ज न मिळाल्याने बँकेचा एनपीए वाढला आणि आरबीआयला बँकेच्या कामकाजावर बंधने आणावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT