Share Market  Sakal
अर्थविश्व

Share Market : येस बँकेच्या शेअर्सचा मागच्या 3 महिन्यांत 38 टक्के रिटर्न्स

8 सप्टेंबरला येस बँकेच्या शेअर्सनी त्यांच्या 20 महिन्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला.

सकाळ डिजिटल टीम

येस बँकेच्या शेअर्समध्ये लाखो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत. शुक्रवारी त्याचे शेअर्स 1.13% घसरून 17.55 रुपयांवर बंद झाले. एक दिवस आधी, गुरुवार 8 सप्टेंबर चांगली तेजी दिसून आली होती. 8 सप्टेंबरला येस बँकेच्या शेअर्सनी त्यांच्या 20 महिन्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला. या तेजीत स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. येस बँकेच्या शेअर्सनी गेल्या तीन महिन्यांत 38% परतावा दिला आहे. आउटलुक सुधारल्यामुळे येस बँकेचे शेअर्स वधारलेत.

रेटिंग अपग्रेड

गेल्या महिन्यात, रेटिंग एजन्सी क्रिसिल आणि इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च (Ind-Ra) यांनी येस बँकेची इंस्ट्रुमेंट्स अपग्रेड केली. क्रिसिल रेटिंग्सने टियर-II बाँड्स (बेसिल 3 अंतर्गत) आणि इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड्स अपग्रेड केले होते. त्याच वेळी, त्याचा आउटलुक स्थिर ते सकारात्मक असा बदलला. दुसरीकडे, इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चने (Ind-Ra) येस बँकेचे लॉन्ग टर्म अश्युअर रेटिंग 'IND A-' वरून 'IND BBB' वर अपग्रेड केले आणि आउटलुक स्थिर केला.

रेटिंग एजन्सींच्या विश्वासाने येस बँकेच्या कामगिरीतील सुधारणा झाल्याचे क्रिसिलने सांगितले. यामध्ये ठेवी, उत्तम मालमत्ता गुणवत्ता, रिस्क मॅनेजमेंट, प्रॉफिटेबिलिटीचा समावेश असल्याचे रेटिंग एजन्सीने म्हटले. मार्च 2020 मध्ये रिकंस्ट्रक्शन स्कीमनंतर बँकेच्या ठेव बेसमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे, शिवाय बँक चांगल्या स्थितीत असल्याचे दिसते.

बँक किरकोळ आणि एसएमईंना कर्ज देण्यामध्ये वाढ करून आपले व्यवसाय मॉडेल सुधारत आहे. कॉर्पोरेट बुकमध्ये, बँक तुलनेत लहान एक्सपोजरवर भर देत आहे. ऍसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीसोबतच्या प्रस्तावित व्यवहारातून बँकेला फायदा होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये बँक 48,000 कोटी रुपयांची स्ट्रेस्ड लोन विकेल असेही क्रिसिल म्हणाले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT