Titan Share Price esakal
अर्थविश्व

Titan Shares : 'टायटन'चे शेअर्स देतील दमदार परतावा, दिग्गजांना विश्वास

शिल्पा गुजर

शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या नजरा कायमच बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांवर असतात.

शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणूकदारांच्या नजरा कायमच बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांवर असतात. राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala), आरके दमानी, डॉली खन्ना, आशिष कचोलिया यांच्यासह शेअर बाजारात असे अनेक दिग्गज गुंतवणूकदार आहेत, ज्यांच्या पोर्टफोलिओवर गुंतवणूकदारांची नजर असते. जर तुम्हाला अनुभवी गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओच्या कोणत्याही स्टॉकमध्ये पैसे गुंतवायचे असतील, तर टायटनच्या (Titan Share Price) शेअर्समध्ये पैसे गुंतवू शकता, असा सल्ला ब्रोकरेज कंपनी (Brokerage Company) मॅक्वेरीनं दिलाय.

टायटनच का?

ब्रोकरेज कंपनी मॅक्वेरीनं या स्टॉकचे आउटपरफॉर्म रेटिंग कायम ठेवलं आहे आणि 3000 रुपयांचे टारगेट दिलं आहे. गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये पैसे गुंतवले तर त्यांना 54 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो, असं ब्रोकरेजचं म्हणणं आहे. ब्रोकरेजच्या अहवालानुसार, कंपनीचा डिमांड ट्रेंड मजबूत दिसत आहे. याशिवाय वाढत्या महागाईमध्ये हा शेअर स्वतःला मजबूत ठेवू शकतो, असा विश्वास ब्रोकरेजनं व्यक्त केलाय.

राकेश झुनझुनवालांचा आवडता स्टॉक

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा समूहाचा (Tata Group) टायटन हा आवडता स्टॉक आहे. मार्च 2022 तिमाहीच्या आकडेवारीनुसार, राकेश झुनझुनवाला आणि असोसिएट्सची टायटन होल्डिंग 5.1 टक्के (44,850,970 इक्विटी शेअर्स) आहे. ट्रेंडलाइननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या 34 स्टॉक आहेत, ज्यांची किंमत 3 जून 2022 रोजी अंदाजे 33,753.9 कोटी रुपये आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Live Update : दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू,चार जखमी

ICC Women’s World Cup 2025 Points Table: भारताच्या पोरींनी शेजाऱ्यांना त्यांची जागा दाखवली, पाकिस्तानची गुणतालिकेत गोची केली

PMC News : बांधकाम परवानगीचे अधिकार द्या; समाविष्ट गावांबाबत पुणे महापालिकेचे राज्य सरकारला पत्र

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

SCROLL FOR NEXT