Lic kanayadan Policy
Lic kanayadan Policy  Team esakal
अर्थविश्व

धूमधडाक्यात करू शकता लेकीचं लग्न!; LIC मध्ये करा फक्त 121 रुपयांची गुंतवणूक

सुमित बागुल

मुंबई - भारतीय जीवन विमा निगम अर्थात (LIC) ने मुलींच्या पालकांसाठी एक अत्यंत चांगली पॉलिसी बाजारात आणली आहे. (LIC) च्या या स्कीमचं नाव आहे (LIC) कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadaan policy) ही स्कीम मुलींचे भविष्य आणि लग्न या दोन्ही गोष्टींना समोर ठेऊन बाजारात आणली आहे. (your daughters wedding can be Dhoom Dhadaka Invest only Rs 121 in LIC)

कन्यादान पॉलिसीची मुख्य अट अशी आहे की, गुंतवणूकदाराचे वय कमीत कमी 30 असले पाहिजे. त्यांच्या मुलीचे वय कमीत कमी 1 वर्ष असले पाहिजे. या स्किमसाठी काही कागदपत्र महत्त्वाची आहेत. ज्यामध्ये आधार कार्ड, जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र या गीष्टींची पडताळणी केली जाते. यात तुम्हाला इन्कम टॅक्स अधिनियम 1961 च्या 80C अंतर्गत भरल्या जाणाऱ्या टॅक्स मध्ये सूट देखील मिळू शकते. ही सूट जास्तीत जास्त दीड लाख (1.50 लाख) आहे.

दररोज गुंतवा १२१ रुपये

एलआयसी कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadaan policy) मध्ये तुम्हाला रोज 121 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. म्हणजे दर महिना तुम्हाला 3,600 रुपये गुंतवावे लागतील. दररोज 121 रुपये गुंतवल्यास 25 वर्षांनी तुम्हाला 27 लाख रुपये मिळतील आणि या 27 लाखात तुमच्या मुलीचं लग्न विनाचिंता अगदी धूमधडाक्यात करता येऊ शकतं.

तीन वर्षांचा प्रिमियम माफ

ही पॉलिसी आहे तर 25 वर्षासाठी, पण प्रीमियम फक्त 22 वर्षे भरायचा आहे. उरलेल्या 3 वर्षासाठी कोणतीही रक्कम भरायची नाही. मुलीच्या वयानुसार या पॉलिसीचा कार्यकाळ (Policy Tenure) कमी सुद्धा करता येऊ शकतो. एलआयसी कन्यादान पॉलिसी 25 वर्षांऐवजी 13 वर्षांसाठी सुद्धा घेता येऊ शकते. या पैशांचा वापर मुलीच्या लग्नाव्यतिरिक्त करिअरसाठी सुद्धा करता येऊ शकतो.

अपघातात मृत्यू झाल्यास 10 लाखांची तात्काळ भरपाई

ही स्कीम तुमच्या मुलीला आर्थिकरित्या सुरक्षित बनवू शकते. या स्कीममध्ये मॅक्युरिटीवेळी एकरकमी पैसे मिळतात. यात वडील किवा पालकांचा मृत्यू झाल्यास प्रीमियम भरण्यात सूट मिळते. अपघातात मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये तात्काळ भरपाई देखील मिळते. तर सामान्य मृत्यू झाल्यास 5 लाख रुपयांची भरपाई मिळेल. मॅचुरिटीच्या वेळेपर्यंत 50,000 रुपयांचे पेमेंट केलं जातं. मॅचुरिटीच्या वेळी पूर्ण मॅचुरिटी रक्कमेची परतफेड केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT