अर्थविश्व

ZEE Entertainment चे सोनी कंपनीत विलीनीकरण, संचालकांची मंजूरी

झी कंपनीच्या संचालक मंडळाने सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (एसपीएनआय) मध्ये विलीनीकरणास तत्वतः मान्यता दिली आहे.

ओमकार वाबळे

मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कंपनी झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेडने मोठा निर्णय घेतला आहे. झी कंपनीच्या संचालक मंडळाने सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (एसपीएनआय) मध्ये विलीनीकरणास तत्वतः मान्यता दिली आहे. यामुळे झी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनित गोयंका यांच्याकडे सर्व कार्यभार जाणार आहे.

बुधवारी सकाळी संचालकांच्या बोर्डाची मीटिंग झाल्यानंतर नॉन-बिडिंग टर्म शीटच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली. यामुळे पुनीत गोयंका यांच्याकडे पाच वर्षांच्या कालावधीसाठी पदाची सूत्र राहणार आहेत.

झी समूहाच्या एक्सचेंज फाइलिंगमधील माहिती

नॉन-बीडिंग फिलिंग शीट मार्फत SPNI दोन्ही नेटवर्कमध्ये समन्वय प्रस्थापित करणार आहे. तसेच दोन्ही संस्था समांतर पातळीवर कार्य करण्यासाठी डिजिटल नेटवर्क, प्रोडक्शन ऑपरेशन आणि प्रोग्रॅम लायब्ररी यांची सांगड घातली जाईल. प्रस्तावित कराराचा एक भाग म्हणून, झी समूहाच्या भागधारकांकडे सुमारे 47.07% भागभांडवल असेल आणि उर्वरित विलीनीकृत कंपनी सोनी इंडियाच्या भागधारकांच्या मालकीची असेल.

टर्म शीट 90 दिवसांचा कालावधी देते, ज्या दरम्यान दोन्ही कंपन्या परस्पर निश्चित करारांना अंतिम रूप देतील, असे फाईलिंगमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhanagari Dam Gate Opened : राधानगरी धरण 100 टक्के भरले! मध्यरात्री 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला; भोगावती नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

मोठी बातमी! पदोन्नतीने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी झालेल्यांनाही ‘टीईटी’चे बंधन; शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितली ‘ही’ मुदत, अन्यथा...

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

SCROLL FOR NEXT