Zomato support for 6000 handicapped in Pune district 
अर्थविश्व

झोमॅटो वादाच्या भोवऱ्यात... पुन्हा मागितली माफी!

ओमकार वाबळे

ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यंदा प्रकरण तामिळनाडूचे आहे. तामिळनाडूतील एका ग्राहकाला हिंदी बोलता येत नसल्याने त्याला ऑर्डरचा परतावा मिळाला नाही. या प्रकरणात झोमॅटोने माफी मागितली आहे. पण झोमॅटोबाबत नेहमीच काही ना काही काँट्रोव्हर्सी होत असते. कंपनी वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे कंपनीला पुन्हा माफी मागावी लागली.

यापूर्वी कंपनीला हृतिक-कतरिनाच्या जाहिरातीसाठी सोशल मीडियावर बऱ्याच ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. एवढेच नाही तर त्याच वर्षी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयबाबत एक वादग्रस्त प्रकरण समोर आलं. हा विषय अनेक दिवस माध्यमांमध्ये चर्चिला गेला.

काय आहे वाद?

अलीकडेच हृतिक रोशन आणि कतरिना कैफसोबत झोमॅटोची जाहिरात आली. या जाहिरातीत दाखवण्यात आले आहे की पावसात पार्सल वितरीत केल्याबद्दल हृतिक रोशन डिलिव्हरी पार्टनरचे कौतुक करतो आणि त्याला त्याच्यासोबत सेल्फी काढण्यास सांगतो. तो फोन आणण्यासाठी घरात जात असताना डिलिव्हरी बॉयला पुढच्या ऑर्डरची सूचना मिळते, आणि सेल्फी क्लिक न करता तो निघून जातो.

या जाहिरातीबाबत कंपनीवर आरोप करण्यात आला की, डिलिव्हरी देणाऱ्यांना योग्य मोबदला देण्याऐवजी कंपनी बॉलिवूड सेलिब्रिटीजमध्ये गुंतवणूक करत आहे. आणि त्यातून स्वत:ची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर झोमॅटोला स्पष्टीकरण द्यावं लागलं. या जाहिरातीत डिलिव्हरी पार्टनरला नायक बनवण्यासाठी आणि त्यांच्याशी आदराने वागले पाहिजे, यासाठी काही गोष्टी ठळक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच स्पष्टीकरण देताना, "प्रत्येक ग्राहक आमच्यासाठी स्टार आहे आणि हृतिक किंवा कतरिनापेक्षा कमी नाही", असं झोमॅटोने सांगितलं.

बंगळुरू प्रकरण

याच वर्षी बंगळुरूमधून एक प्रकरण नोंदवलं गेलं. ज्यामध्ये एका महिलेने फूड डिलिव्हरी अॅप Zomato वरून ऑर्डर केली होती. पण वेळ लागत असल्याने तिने ऑर्डर रद्द केली. असं असूनही, डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन येतो आणि नंतर वाद सुरू होतो. यानंतर महिलेने डिलिव्हरी बॉयवर गंभीर आरोप केले होते. जेवण घेण्यास नकार देताच डिलिव्हरी बॉयने तिच्या चेहऱ्यावर ठोसा मारला. यावर बराच वाद झाला. परंतु नंतर या प्रकरणात या महिलेचा दोष असल्याचे निष्पन्न झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT