zomato sakal
अर्थविश्व

Zomato: झोमॅटोचे शेअर्स एका दिवसात 14% पेक्षा जास्त वाढले

वाचा, आणखी किती वाढेल शेअर ?

सकाळ डिजिटल टीम

फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअर्समध्ये तेजीचे पुनरागमन झाले आहे. सप्टेंबरच्या तिमाहीतील कंपनीच्या चांगल्या निकालांमुळे शुक्रवारी झोमॅटोच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली. झोमॅटोचे शेअर्स 13.60% वाढून शुक्रवारी 72.65 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या शेअर्सने इंट्राडेमध्ये 73.45 रुपयांचा उच्चांक गाठला. तर इंट्राडे लो 65.70 रुपये आहे.

चांगले तिमाही निकाल


चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचा तोटा कमी झाला आहे.सप्टेंबरच्या तिमाहीत तिचा कंसॉलिडेटेड नेट लॉस कमी झाला. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील हा तोटा 430 कोटी होता, जो आता 251 कोटी रुपयांवर आला आहे. झोमॅटोचा रेव्हेन्यूही चांगली कामगिरी करत आहे.

सप्टेंबर तिमाहीत तिचा कंसॉलिडेटेड रेव्हेन्यू 62.2 टक्क्यांनी वाढून 1,661 कोटी रुपये झाला आहे. तर मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीचा महसूल 1,024 कोटी रुपये होता.

झोमॅटोची ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यूमध्ये वाढ


कंपनीच्या फूड डिलिव्हरी व्यवसायाचे ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू (GOV) दरवर्षी 23 टक्के आणि सप्टेंबर तिमाहीत 3 टक्क्यांनी वाढले. सप्टेंबर तिमाहीत ऑर्डर्सची संख्या आणि सरासरी ऑर्डर्सची व्हॅल्यूया दोन्हीमध्ये वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ग्लोबल रिसर्च फर्म जेफरीजने झोमॅटोच्या शेअर्सचे बाय रेटिंग अपडेट केले आहे. जेफरीजने झोमॅटोचे शेअर्स 42% वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार झोमॅटोच्या शेअर्ससाठी टारगेट 100 रुपये निश्चित करण्यात आले आहे. एडजस्टेड एबिटदा 60 कोटींवर आला आहे. जो अपेक्षेपेक्षा चांगला आहे, ज्यामुळे ब्रोकरेज फर्मने शेअर्सबाबत सकारात्मक झाले आहेत. मॉर्गन स्टॅनलीने झोमॅटोला 80 रुपयांच्या टारगेटसह ओव्हरवेट रेटिंगही दिले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT