Zomato Sakal
अर्थविश्व

झोमॅटो लॉन्च करणार जलद सेवा

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो आपल्या सेवेत बदल करण्याची योजना आखत आहे. ही सेवा अधिक जलद करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो आपल्या सेवेत बदल करण्याची योजना आखत आहे. ही सेवा अधिक जलद करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो (Zomato) आपल्या सेवेत (Service) बदल करण्याची योजना आखत आहे. ही सेवा अधिक जलद करण्यात येणार आहे. फक्त १५ ते २० मिनिटांत डिलिव्हरी (Delivery) होईल, अशी सेवा सुरू करणार असल्याचे झोमॅटोकडून सांगण्यात आले आहे. यासाठी अनेक हॉटेल्ससोबत झोमॅटोची बोलणी सुरू आहे.

यासाठी झोमॅटो क्लाऊड किचन कंपनी आणि रेस्टॉरंट्ससोबत भागीदारी करणार आहे. याद्वारे अल्ट्रा फास्ट सेवा सुरू करण्याचा झोमॅटोचा मनोदय आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर १० मिनिटांत डिलिव्हरीची सेवा सुरू करण्यात येणार आहे. एप्रिलपासून काही शहरांमध्ये पायलट प्रोजक्ट लॉन्च करण्यात येणार आहे. सर्वात आधी गुरुग्राममध्ये ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. झोमॅटोने गेल्या वर्षी बंगळुरूत हा प्रयोग केला होता.

ज्यात रेस्टॉरन्ट थेट ग्राहकांना निवडक पदार्थ देऊ शकेल, असा प्लॅन बनविण्याचा प्रयत्न झोमॅटो करत आहे. गेल्या वर्षी शेअरबाजारात झोमॅटोचा शेअर लिस्टिंगमध्ये आला होता. त्यानंतर कंपनीने चांगल्या प्रकारे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. झोमॅटोचे संस्थापक दिपींदर गोयम म्हणाले होते की, आम्ही त्याच व्यवसायात गुंतवणूक करू जिथे मार्केट कॅप १० अरब डॉलरपेक्षा जास्त असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संगीत कलाकारांना १० लाख रुपये मिळणार, गायिका आशा भोसले यांच्या नावाने 'जीवन गौरव पुरस्कार' सुरू होणार; सरकारचा मोठा निर्णय

Boisar MIDC Accident : वटपौर्णिमेला एकत्र पुजला वड, दोन दिवसांतच नियतीचा क्रूर घाला! बोईसर एमआयडीसीत नवविवाहित तरुणाचा दुर्दैवी अंत; कॉम्प्रेसरचा व्हॉल्व्ह उघडताना काय घडलं?

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत पूलाअभावी शाळकरी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

भारतापासून सर्वात दूरचा देश! जगातील सर्वात रहस्यमय बेट, अंटार्क्टिका अन् वाळवंट... 'या' देशाने भारतीयांना दिलं खास आमंत्रण

IND vs ENG 2nd T20: संजूचा पत्ता कट? दुसऱ्या टी-20 आधी वैभव सूर्यवंशीबाबत मोठी अपडेट! दुसऱ्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

SCROLL FOR NEXT