औरंगाबाद : आमदार अंबादास दानवे  
Blog | ब्लॉग

निमित्त अंबादास दानवे, नियम सर्वसामान्यांना दाखवण्यासाठी का?

गणेश पिटेकर

एक रिक्षाचालक वाहतूक नियम तोडून मधेच घुसल्याने दानवे यांनी त्याच्या कानशिलात लगावली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

औरंगाबाद : राज्यात कायदा व सुव्यवस्था पाहण्यासाठी पोलिस यंत्रणा आहे. त्यात काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गैर नाही. तो त्यांचा कर्तव्याचा भाग आहे. सोमवारी (ता.२८) औरंगाबादच्या क्रांती चौकात वाहतूक कोंडी झाली होती. ती तोडण्यासाठी पोलिसांबरोबर आमदार अंबादास दानवे रस्त्यावर उतरले होते. एक रिक्षाचालक वाहतूक नियम तोडून मधेच घुसल्याने दानवे यांनी त्याच्या कानशिलात लगावली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर प्रतिक्रिया देताना आमदार दानवे म्हणाले, की ज्या व्यक्तिला मारले तो त्यांच्या ओळखीचा आहे. नियम तोडल्याने त्याच्यावर रागावलो आणि त्यानंतर त्याला समजावून सांगितले. यानिमित्त काही प्रश्न उपस्थित होतात.

एक कायद्याचे उल्लंघन केल्यास सर्वसामान्यांनाच ज्ञानाचे डोस पाजून कारवाई होताना दिसते. जर त्या रिक्षाचालकाच्या ठिकाणी बडी व्यक्ती असली असती तर आमदारांनी जसे रिक्षावाल्याच्या बाबत प्रतिक्रिया दिली तशी दिली असती का? बर आपण असं काही तरी करुन जनतेच्या समोर प्रतिमा बांधणी करतोय असही संबंधितांना वाटत असेल. राज्यात डेल्टा प्लस या कोरोनाच्या नवा अवतारामुळे परत निर्बंध कडक केले जात आहे. अनेक जणांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

घरातला पैसा संपला आहे. काहींना बँकेतील मुदत ठेवी मोडून घरखर्चासाठी वापरत असल्याचे उदाहरणे अवती-भवती पाहायला मिळत आहेत. आपल्या समाजव्यवस्थेत दुर्बलावर कधीही आणि केव्हाही कारवाई होताना दिसते. त्याच्यासाठी दोन वेळेची भाकर मिळवणे इतर गोष्टींपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. नियम, कायदे, शिस्त हे सर्व सर्वसामान्यांनी मुकाट्याने पाळायचे. प्रश्न विचारायचे नाहीत. तुम्ही फक्त मतदान करायचे आणि राजकारण्यांना निवडून द्यायचे? बरं कोणी प्रश्न विचारलाच तर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT