मराठी माय 
Blog | ब्लॉग

माय मराठी की MY मराठी

डॉ. शंतून अभ्यंकर (वाई, जि. सातारा)

हां तर मी काय सांगत होतो... आपलं जिणं, राहणं, खाणं सगळं सगळं बदललं आहे. एका इंग्लिश मीडियम स्कूलच्या, ऍन्युअल डे फंक्‍शनला, मी परवा चीफ गेस्ट होतो..! खर तर चीप गेस्ट होतो. माझ्या इतका सस्त्यातला गेस्ट दुसरा मिळणे दुरापास्त हुते. स्वतःच्या खर्चाने शाळेत जाऊन, स्नेहसंमेलन सहन करून, वर देणगी देणारा असा विरळाच. शिवाय चिल्यापिल्यांची दंगामस्ती पाहात आणि ऐकत मी भाषणही ठोकले. ते तब्बल साडेतीन मिनिटांवर चिमुकल्या श्रोत्यांना आणि मलाही सोसवेना; पण त्या दोन- तीन तासांत मी तिथे जी भाषा ऐकली, ती थक्क करणारी होती. 

घरीदारी मराठी बोलणाऱ्या, घरीदारी मराठी चालणाऱ्या, घरीदारी मराठी वागणाऱ्या त्या चिमुरड्यांचे शिक्षण इंग्रजीतून चालू होते. भाषा इंग्रजी आणि संस्कृती, मराठी अशी रस्सीखेच चालली होती. चांगलीच कुतरओढ होत होती सगळ्यांची. पाहणाऱ्याला मौजेची वाटत असली तरी प्रकार अंतर्मुख करणारा होता. गॅदरिंग संपताच सगळी किलबिल सरली होती. प्रिन्सिपॉल बाईंच्या केबिनमध्ये "च्या मारी'च्या साथीनं (चहा आणि मारी बिस्किट) चर्चा रंगली होती. संत वचनांनी, संत महंतांच्या तसबिरींनी आणि पुतळ्यांनी बाईंभोवती प्रभावळ धरली होती. मधूनच शाळेत आया म्हणून काम करणाऱ्या सुलामावशी कुठे आहेत असा प्रश्न विचारायची वेळ त्या माउलीवर ओढवली. शाळेत इंग्लिश आणि फक्त इंग्लिशमध्येच बोलायचे असा फतवा होता. मग काय थेट सवाल आला, व्हेअर आर सुलामावशी? आदरार्थी बहुवचनाने आता लुगड्यातून झग्यात प्रवेश केला होता आणि तत्पर उत्तरही आले, सुलामावशी आर डाऊन..! 

सगळे शिक्षणतज्ज्ञ वगैरे वगैरे सांगतात, की मातृभाषेतून शिक्षण हेच योग्य; पण माझ्यासकट अख्ख्या होल महाराष्ट्रात हे फारसं कुणीच मनावर घेतलेलं दिसत नाही. मुलांना लहानात लहान वयात इंग्लिश मीडियममध्ये घालायची अगदी चढाओढ सुरू आहे. पोरंही जरा येस- फेस करू लागली की मऱ्हाठी संस्कृतीला आणि घरच्या मऱ्हाठी भाषिकांना फालतू समजू लागतात आणि अशा पोरांचं कौतुकही वाटतं मायबापाला. प्रश्‍न हा आहे. उत्तम इंग्लिश येणं आज जीवनावश्‍यक आहे; पण म्हणून उत्तम मराठी येणं आणि बोलणं हे कमअस्सल कसं? 

मला तर लोकमान्य टिळक, शिवाजी महाराज वगैरे मंडळी इतर भाषेत बोलायला लागली की अस्वस्थ वाटतं. टिळक कुठल्याशा मालिकेत हिंदीत बोलत होते. स्वराज्य हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार असून, तो ते मिळवणारच असल्याचं, त्यांनी हिंदीत सांगितल्यामुळे मला बराच वेळ ते पटेचना. "अर्रे, ये अपना आदमी हिंदीमे कैसे बोल्नेकू लग्या?', असा प्रश्न मला पडला होता. देवबीव मंडळीसुद्धा माझ्या लहानपणी उत्तम मराठी बोलत; पण मी इंग्लिश मीडियममध्ये गेल्यावर तीही इंग्लिशमध्ये बोलायला लागली! Curse, Penance, Wishes हे शब्द अमर चित्र कथांतून माझ्या शब्दसंपदेत जमा झाले. 

फार काही बिघडलं असं माझं म्हणणं नाही. संस्कृती आणि भाषा या प्रवाही असतात. पसायदान कोणत्या भाषेत आहे? असं विचारल्यावर, संस्कृत..! असं उत्तर देणारी मुले आहेत. त्यांचं काही चूक नाही. त्यांच्या कानावर पडलेल्या मराठीचा आणि पसायदानातल्या मराठीचा संबंध नाही एवढाच याचा अर्थ; पण पसायदान परके वाटायला अनेक वर्षे जावी लागली. पुलं परके व्हायला अजून काही दिवस पुरतील आणि कदाचित वीसच वर्षांनंतर, या सदरातील लिखाण मराठीत होतं बरं, असं सांगावं लागेल. 
संस्कृतीचा आणि भाषेचा हा बदलांचा झपाटा छाती दडपून टाकणारा आहे, एवढंच...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT