eSakal_Blog_Mumbai_Local_Talk 
Blog | ब्लॉग

रेल्वेतील छेडछाड आणि सर्व्हे 

हर्षदा परब

मी प्लॅटफॉर्मवरुन चालत होते. मला मोटरमनच्या मागचा महिलांचा डब्बा पकडायचा होता. मागून ट्रेन आली. त्या ट्रेनमधून बाहेर लोंबकळणारा एक मुलगा. त्याने प्लॅटफॉर्मवरुन चालणाऱ्या  मुलीच्या मागून तिला टच होणार नाही इतक्या अंतरावरुन तिच्या पृष्ठभागापासून मानेपर्यंत काही सेकंदात अत्यंत अश्लिलपणे हात फिरवला.  मी चरकून गेले. अरे आत्ता हीच ट्रेन, हाच डब्बा माझ्या बाजूने गेला... याने मला पण असं नाही ना केलं ? संतापाने अंग तापलं होतं. ती मुलगी प्लॅटफॉर्मवरुन दिसेनाशी झाली. बहुधा ती मधल्या महिलांच्या डब्यात बसली असणार. 

मग मी स्वतःशीच भांडत राहिले. ती मुलगी तक्रार करू शकली असती का? हा प्रसंग आठवला की हाच विचार करतेय आजवर. काय सांगितलं असतं तिने त्या मुलाबद्दल? तिने तर ते पाहिलंही नव्हतं किंवा तिला त्या मुलाचा स्पर्शही झाला नव्हता. हो पण अतिशय विचित्र पद्धतीने त्याने तिच्या पाठीमागून हात फिरवला होता. अनेक दिवस तो प्रसंग डोळ्यासमोर दिसायचा आणि रागाने अंग तापायचं. अनेक विचार सारखे डोक्यात गरगरायचे. हो, म्हणूनच असेल मुली मागून सॅक घेत असतील. समोरुन आलेल्या व्यक्तीचा त्या सामना करतील मात्र मागून हात लावणाऱ्या माणसाला कसं ओळखतील, काय करतील? अशांपासून वाचण्यासाठीच त्या मागे सॅक घेत असतील ?

गर्दी, धक्काबुक्की, मारामाऱ्या, बसयाला न मिळणे, कपडे फाटणे, दागिने तुटणे, फोन हरवणे, पाकीट हरवणे, नातेवाईक मागे सुटणे याबरोबरच मुंबईच्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या बायकांना छेडछाडीचा त्रास सहन करावा लागतो. म्हणजे फक्त शिट्या, कमेंट्स, किंवा चाळे करणारे लोक भेटतात अस नाही तर. तिकिटाच्या रांगेत उभ्या असलेल्या, चुकून जेण्टस डब्यात चढलेल्या किंवा जेण्टस डब्यातून उतरणाऱ्या, प्लॅटफॉर्मवर गाडी पकडण्यासाठी सज्ज असलेल्या मुलीच्या पृष्ठभागाला नाहीतर छातीला हात लावणारेही या गर्दीत असतात. कधी तर मुलींच्या पृष्ठभागाला मागून किंवा पुढून मुद्दाम चिकटणारे लोकही असतात. 

 ट्रेनमध्ये चढताना गर्दीत बॅग अडकू नये म्हणून बायका ती पुढे लावतात हे जितकं खऱं तितकंच खरं की त्या चालत्या ट्रेनमधून झुकणाऱ्या आणि लटकणाऱ्यांकडून छातील स्पर्श होऊ नये, त्यांना छातीवर मारू नये यासाठी त्या बॅग पुढे घेत असाव्यात. असं प्रवासात भरलेली ट्रेन समोरुन जातान डबा पकडणाऱ्या बायकांना हात लागल्यानंतर रागाने शिव्या देणाऱ्या बायका पाहण्याचाही अनुभव येऊन गेलाय दोन-तीन वेळा. 

पुकार संस्थेत माटुंग्याच्या गुरु नानक खालसा महाविद्यालयातील 10 विद्यार्थ्यांनी रेल्वेमध्ये होणाऱ्या छेडछाडीबाबत सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये देखील त्यांनी या गोष्टींचा आढावा घेतला आहे. सर्व्हे करणारे सर्व विद्यार्थीच होते. त्यातल्या 10 विद्यार्थ्यांपैकी 8 मुली होत्या आणि त्यातल्या 6 जणींना ट्रेनच्या प्रवासात छेडछाड झाली होती. तेव्हा त्यांनी याच विषयावर सर्व्हे करायचा निर्णय घेतला. यातील स्टेला फर्नांडिस सांगते. कॉलेजमध्ये गेल्यावर ट्रेनच्या प्रवासाचा संबंध आला. मैत्रिणींना भेटायला जाताना, फिरायला जाताना किंवा शॉपिंगला जाताना सुरुवातीला ट्रेनचा प्रवास केला. तेव्हा सर्वांनी वेगवेगळ्या सुचना केल्या, मोबाईल, पर्स सांभाळ, घरी लवकर ये, वस्तू हरवू नको वगैरे. पण कोणी  ट्रेनच्या प्रवासाता स्वतःला सांभाळ, कोणापासून सांभाळ आणि कसं सांभाळ हे सांगितलंच नव्हतं. हे सगळे अनुभव नव्याने घेतले तेव्हा घाबरलोच सुरुवातीला. स्टेलाचं हे वाक्य आपण सुरक्षिततचे जे सल्ले देतो त्यात काय काय बाबी अॅड करायला हव्या याचा विचार करायला लावणाऱ्या आहेत. 

हा सर्व्हे मला आणखी महत्त्वाचा वाटतो कारण तो मुलींना वाटणाऱ्या 'सेफ्टी' या शब्दाबद्दलही भाष्य करतो. या सर्व्हेमध्ये स्पष्ट नमूद केलं आहे की अनेक मुलींना जे त्यांच्याबरोबर होतंय ते योग्य होत नाही याची देखील जाणीव नव्हती. तसंच 'वेळ नाही किंवा उशीर होईल ' या कारणाने  छेडछाडीकडे दुर्लक्ष करुन, किंवा फक्त त्याने घाबरुन जाऊन मुली पुढे निघून जातात. 

ट्रेनमध्ये होणारी धक्काबुक्की, चुकीच्या ठिकाणी हात लागणे, वाईट कमेंट्स करणे, शिट्या आणि अगदी पॅण्टची झीप उघडून किळसवाणे चाळे करणे ते टक लावून बघणे हा ट्रेनचा प्रवास बायकांना नुसता दमवत नाही तर लाजवतो. त्या माणसांबद्दल जेवढी भीती-चीड निर्माण करतो त्याहीपेक्षा जास्त त्रास स्वतःच्या शरिराचा होतो. पण दररोजचा हा त्रास ट्रेनच्या वेळा बदलून कमी होणार नाही. तर अशा गोष्टींविरोधात 'मोठ्याने बोलून, तक्रार करुन, योग्य पद्धतीने व्यक्त होऊन आणि दोषीला शिक्षा करुन कमी होईल. हे एकदा तरी करुन बघितलं पाहिजे.हे या सर्व्हे करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं मत आहे.

वेगवेगळ्या संस्थांनी छेडछाडीबद्दलचे हे सर्व्हे केले. मात्र त्यांचा विशेष परिणाम दिसला नाही. मुली-महिला ज्या दिवशी पुढे येेऊन मोठ्या संख्येने तक्रारर करतील आणि यंत्रणांकडून करावाई होईल. यातल्या जास्तीत जास्त रेल्वेराक्षसांना शिक्षा होईल तेव्हा आणि तेव्हाच या मोहिमा हे सर्व्हे यशस्वी होतील असं मला वाटतं.  

बायकांच्या डब्यातही मुलींना किंवा महिलांना ही छेडछाड होते. त्याबाबत एका ब्लॉगमध्ये नक्की लिहीन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT