Article on Atalbihari Vajpayee
Article on Atalbihari Vajpayee 
Blog | ब्लॉग

आदर्श पुरुष

अतुल क. तांदळीकर

आज सकाळपासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीबाबत वृत्त वाहिन्या आणि सोशल मीडियावर त्यांच्या कारकिर्दीतील आठवणी ना अनेकांनी उजाळा दिला. अखेर सायंकाळी त्यांच्या निधनाने वृत्त झळकले. एक अजातशत्रू असं हे व्यक्तिमत्व म्हणजे एक युग आहे,जेव्हा केव्हा ते क्षणभर का होईना आठवतील तेंव्हा तेंव्हा हे युग आगामी पिढया पुढे तरळत राहील यात संदेह नाही.

आज त्यांच्याबाबत जी काही चर्चा होत आहे, जे बोलले जात आहे हे सर्व एका आदर्श पुरुषबाबत बोलले जात आहे, या देशातील नागरिकाला राजकारणाबाबाबत प्रचंड तिटकारा निर्माण होत असताना या क्षेत्रात असं प्रेम करायला लावणार व्यक्तिमत्व असू शकतं हा विश्वास अटलजीनी आपल्या व्यक्तिमत्वातून नागरिकांमध्ये निर्माण केला. एक चांगलं व्यक्तिमत्व समाज बदलासाठी किती उपयुक्त असतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अटलजी।

आपण सर्वांनी समाजात वावरतांना कसे प्रेझेंट झालं पाहिजे, आपला attitude  कसा असावा,आपले बोलणे कसे असले पाहिजे,कोणत्या वेळेस संयम, बाळगावा, आक्रमक व्हावे याचं अचूक timing त्यांचेकडे होतं. आज आपण समाजात वावरतो तेव्हां याच गोष्टींची नेहमी उणीव भासते,कदाचित आजच्या जनरेशनने अटलजींच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास आणि निरीक्षण केले तर त्यांना समाजात वावरताना येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करणे सोपे जाईल. त्यांची भाषणे, कविता प्रेरक आहेत, दुर्दैवाने राजकारणात येऊ घातलेल्या पिढीने त्यांना एका विशिष्ट हेतूने चौकटीत बांधून ठेवले, वस्तुतः माध्यम जगताने, असा विकिपीडिया तयार करायला हवा तो सर्व next generation साठी उपयुक्त ठरावा. 

काहींनी त्यांच्या आठवणी जागवताना त्यांच्या अनेक पैलूंना छान अधोरेखित केले जया जेटली यांनी त्यांच्याकडील विवाह समारंभात अटलजी आले असता त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्याशी केलेली मनमोकळी चर्चा असो की राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांपुढे ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नावाचा प्रस्ताव असो त्यांनी समाजात आदर्श वस्तुपाठ काय असतो हे सोदाहरण स्पष्ट केले. त्यांच्याबद्दल खूप लिहिले जाईल वाचले जाईल पण ते कसे जगले, त्यांनी संघर्ष केला हे जाणून वाटचाल केली तर नक्कीच भारतात एक आदर्श समाज निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, अटलजीना हेच हवं होतं तेव्हां चला आपण या आदर्श व्यक्तिमत्वाच्या वाटेवर चलूया।


अतुल क. तांदळीकर
7719953988

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: अमेठी, रायबरेलीची जागा लवकरच जाहीर होणार; खर्गे घेणार पत्रकार परिषद

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT