live 
Blog | ब्लॉग

मनामधलं इंधन

राजेश अग्निहोत्री,नाशिक


मनामधलं इंधन..

  एका पेट्रोलपंपावर घडलेला हा वास्तवातील किस्सा आहे. हया घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला आहे त्यांना त्यादिवशी निश्‍चितच आनंदी जीवनाबाबत मोलाची शिकवण मिळाली असावी आणि मी स्वतः त्यापैकी एक भाग्यवान साक्षीदार आहे....
   
पेट्रोलपंपावर तो युवक रांगेमध्ये बराच पुढे होता. आम्ही एकंदरीत आठ दहा लोक रांगेमध्ये होतो. या पेट्रोलपंपावर रांगेत उभं असलं तरी त्याचा मुळीच त्रास वाटत नाही. याचं कारण इथली स्वच्छता, टापटीपपणा, स्वच्छ गणवेषातले हसतमुख कर्मचारी आणि सर्वात विशेष म्हणजे पंपावर दिवसभर सुरु असलेला 'एफएम रेडिओ'. पेट्रोल भरायला येणाऱ्या ग्राहकांना जुन्या हिंदी चित्रपटगीतांची ही काही काळाची मेजवानीच असते. असो. 
त्या युवकाचा नंबर आला. त्याने त्याच्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरलं, पैसे दिले आणि गाडी 8 ते 10 फूट पुढे नेऊन तो जागीच थांबून राहिला. कर्मचाऱ्याने पुढील ग्राहकाच्या गाडीत पेट्रोल भरले. तोही निघून गेला तरी हा युवक तिथेच थांबून होता. कर्मचाऱ्याने विचार केला की काही सुट्टे पैसे वगैरे द्यायचे राहिलेले तर नाही, तरी हा कशासाठी असा थांबला असावा? म्हणून त्याने खुणेने त्या युवकाला विचारणा केली की, 'मित्रा, का बरं थांबला आहेस?'
मित्रहो, त्या युवकाचं उत्तर ऐकून आम्ही आश्‍चर्यचकीत झालो आणि कर्मचाऱ्यासह आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर एकदम स्मीत उमटले. 'का बरं थांबला आहेस?' अशी विचारणा करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याने उत्तर दिलं होतं की, "एफएम वर आवडीचं गाणं लागलंय ना, ते ऐकतोय....!" 
हे उत्तर ऐकलं आणि मी एकदम अंतर्मुख झालो. त्वरीत मनात विचार डोकावला की खरंच, वाहनांप्रमाणेच मनालाही इंधनाची गरज असते की! वाहनासारखेच सर्वत्र धावणाऱ्या शरीराला अन्नरूपी इंधनाची जशी आवश्‍यकता असते तशीच मनालाही आवश्‍यक त्या इंधनाची गरजही असणारच! शरीराला गृहीत धरता येत नाही, मग मनालाही याबाबतीत गृहीत धरून कसे चालेल? थोडा अधिक विचार केल्यानंतर जाणवलं, खरोखर पोषक, सकारात्मक विचारांचे, आनंददायी, अल्हाददायी आदी प्रकाराचे इंधन पुरविल्यावर मनुष्याचे ह्रुदयरुपी इंजिनदेखील का बरे अधिक चांगल्या प्रकारे परफॉर्म करणार नाही ? मन का बरे प्रसन्न आणि तंदूरुस्त रहाणार नाही? का नाही ते आनंदविश्‍वात एक छानपैकी रपेट मारून येणार? 
थोडक्‍यात असे इंधन मनामध्ये भरून घेण्याची मुळात आपली इच्छा असली पाहिजे. त्यासाठी थोडी सवडही काढली पाहिजे. आपले छंद, आवडीनिवडी, जिव्हाळा लावणारी माणसे, मित्रपरिवार, निसर्गाचे सानीध्य, ठराविक आवडीची ठिकाणे आदी गोष्टी मनामध्ये या प्रकारचे इंधन भरून देणारे पेट्रोलपंपच असावेत, नाही का? ठरलं तर मग, मनाच्या इंधनाची टाकीपण सदैव फुल्ल करून घेत जावुयात. आयुष्य हे आनंदयात्रा म्हणून घडवायचं आहे ना? 

-post.rajeshagni@gmail.com 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WOMEN'S ASIA CUP 2026 FINAL: पाकिस्तानचा पत्ता कट अन् भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान! महिला एशिया कप फायनल कधी, कुठे आणि किती वाजता?

CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

SCROLL FOR NEXT