residentional photo 
Blog | ब्लॉग

......अन् मृत्युच्या दाढेतून काढले बाहेर!

डॉ.सुधीर शेटकर,कॉर्डिओलॉजिस्ट,अपोलो हॉस्पिटल,नाशिक

      फास्टफुडचा आहारात अतिवापर,व्यायामाचा अभाव आणि बैठे काम यासारख्या बाबींमुळे सर्वांचीच जीवनशैली बदलली आहे. तात्काळ मिळणाऱ्या अत्याधुनिक उपचार पध्दतीमुळे जीव वाचवणे हे शक्‍य असलेतरी डॉक्‍टरांसाठी ते एक आव्हानच बनले आहे. प्राप्त परिस्थितीत हे आव्हान स्विकारून रूग्णांला ठणठणीत बरे,तंदूरूस्त करण्यात डॉक्‍टरांचाच महत्वपूर्ण वाटा राहिला आहे. गेल्या आठवड्यात नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये एका अठरा वर्षीय आणि शंभर किलो वजन असलेल्या युवकाला तीव्र हदयविकाराचा झटका आला. न समजल्यामुळे केवळ फॅमिली डॉक्‍टरकडे किरकोळ उपचार करून त्याने आपले दैनंदिन कामकाज सुरु ठेवले मात्र आठ तासांनंतर जाणवू लागलेला त्रास आणि त्यानंतर रूग्णालयात दाखल झाल्यानंतर वाढलेला उच्चदाब आणि सततच्या झटक्‍यामुळे प्राणवायु(ऑक्‍सीजन)चे अत्यल्प त्यामुळे शरीरास नुकसान पोहचून आढळलेले शंभर टक्के ब्लॉकेज...अशा परिस्थितीत तातडीने अँन्जोप्लॉस्टीचा निर्णय घेत ही सारी आव्हानात्मक परिस्थिती स्विकारत शस्त्रक्रीया केली व त्या युवकाचे प्राण वाचवले....हे सारं ठिक आहे पण यानिमित्ताने अशी परिस्थिती का ओढावते,रूग्ण का दुर्लक्ष करतो,स्वतःची काळजी का घेत नाही...यासारखं एक नव्हे अनेक प्रश्‍न उभे ठाकले आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लोकांना माहिती होण्यासाठी हा सर्व प्रपंच... 

"लाईफ इज प्रेशियन' अर्थात जीवन हे मौल्यवान आहे...असे आपण अनेकदा ऐकवतो,वाचतो,पण आपण खरंच अशा या मौल्यवान जीवनाचा आपण योग्यपध्दतीने सांभाळा करतो का, नित्यनियमाने त्यांच्याकडे चांगले लक्ष देतो का, जीवनाच्या प्रत्येक घटकाकडे गांभीर्याने पाहतो का....तर याचे उत्तर नाही असेच आहे. समाजातील फारच थोडे बोटावर मोजण्याइतकेच लोक, आपल्या आरोग्याकडे हि संपदा आहे. हे लक्षात घेऊन आहार,विहार आणि सर्वचबाबतीत काळजी घेतांना दिसतात. उर्वरीत लोक माहीत असूनही जाणूनबुजून म्हणा किंवा "काही होणार नाही,झाले तर पाहुन घेऊ ' असं सांगत त्याकडे दुर्लक्ष करतात,पण हे दुर्लक्षच कधी कधी आपल्याला संकटात टाकते,आपल्याच जीवावर बेतते हे सुज्ञ माणसांना समजतच नाही. अठरा वर्षाच्या राजेश(नाव बदलले आहे) च्या बाबतीतही असेच घडले. गेल्या आठवड्यात सकाळी सहाला ऍसीडीटीमुळे छातीत कळा येऊ लागल्या,दुखत असावे,असे गृहीत धरून तो आपल्या स्थानिक डॉक्‍टरांकडे गेला. डॉक्‍टरांकडून ऍसिडीवर गोळ्या,औषधे देत त्याला घरी पाठवले. पण छातीत का दुखते,हदयात काय चालले असेल हे रूग्ण राजेश आणि डॉक्‍टर दोघांनाही समजले नाही. सकाळी सहाच्या या घटनेनंतर तब्बल आठ तासांनी दुपारी दोनला छातीतील या कळांचे प्रमाण

    जास्तच वाढल्याने तसेच श्‍वासोच्छवास घेण्यासही त्रास जाणवू लागल्याने तो अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. 
इमर्जन्सी कक्षात दाखल केल्यानंतर तातडीने इको आणि ईसीजी केल्यानंतर त्याला हदयविकाराचा तीव्र झटका आल्याने श्‍वासोच्छवासाचे प्रमाण हे पंधरा टक्‍क्‍यांपर्यत आले होते. त्याचप्रमाणे उच्चरक्तदाब आणि प्राणवायु(ऑक्‍सीजन)चे प्रमाणही कमालीचे घसरले होते. हे राजेशला माहितच नव्हेत एवढे कमी प्रमाण असतांना व्यक्ती जीवंत राहू शकते हे अविश्‍वसनीय असेच होते. माझ्या संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातील करिअरमध्ये हदयविकाराचा तीव्र झटका आलेली आणि आठ तासापर्यत लढा देत जीवंत राहणारी व्यक्ती मी राजेशच्या रूपाने बहुधा पहिल्याच पाहिली. सारं काही आश्‍चर्यकारक असेच होते. पण हे सत्य होते, ते नाकारून चालणार नव्हते. मी तातडीने त्यांच्यावर तात्काळ करावी लागणारी प्राथमिक ऍन्जोप्लास्टी(प्रायमरी ऍन्जोप्लास्टी) करण्याचा निर्णय घेतला. ऍन्जोग्राफीमध्ये हदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये शंभर टक्के अडथळे निर्माण झाला होता,शिवाय आजूबाजूच्या भागातही सततच्या झटक्‍यामुळे बरेच नुकसान झाल्याचे दिसले. 
पाच सहा तासांच्या मेहनत परिश्रमानंतर राजेशवर ऍन्जोप्लास्टी केली.तो हदयविकाराचा झटका आल्यानंतर तब्बल आठ तासांनी दाखल झाल्यामुळे त्यांच्या हदयाला मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहचले होते. पण त्याला ही बाब माहिती नसल्याने शिवाय त्याने छातीत येणाऱ्या कळा,दुखणे हे सारं अगदी सहजपणे घेतल्याने ही परिस्थिती ओढावली होती. आठवडाभर हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्याला सोडण्यात आले. पण यानिमित्ताने काही प्रश्‍न उपस्थित होतात, ते म्हणजे त्याला अशा प्रकारे तीव्र स्वरूपाचा हदयविकाराचा झटका का आला असेल?,त्याला मधुमेह,उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रोलही नाही. कसल्याही प्रकारचे व्यसन नाही शिवाय त्याच्या कुटुंबातही कुणाला हदयविकाराचा झटका अथवा त्रास यापूर्वी झालेला नाही. मग राजेशलाच का तीव्र स्वरूपाचा हदयविकाराचा झटका आला असावा. यामागील कारण शोधण्याचा मी प्रयत्न केला तर व्यायामाचा अभाव,अतिआहार सेवन आणि वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष(100 किलो) ही दोन कारणे आढळली त्यामुळेच त्याला हदयविकाराचा झटका आला हे नक्की. शिवाय एक असेही आढलले की हदयविकार या आजारासंदर्भातील बाबी त्यांच्या वेळीच लक्षातच आल्या नाही, त्यानेही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. वेळेत विशेष तज्ञांचा सल्ला,मार्गदर्शन मिळणे हे गरजेचे असते. कारण वेळेत,सल्ला,मार्गदर्शन मिळाले तर त्यावर उपचार करून होणारे नुकसान हे टाळता येऊ शकते. पण तसे काहीही न केल्यास, आपल्या आजाराकडे दुर्लक्ष,निष्काळजीपणा केला तर शरीरातील अवयवांच्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले हे मात्र नक्की...! 
drsudhirss@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

SCROLL FOR NEXT