child friendly facilities
child friendly facilities 
Blog | ब्लॉग

लग्न सोहळा हवा चाईल्ड फ्रेंडली..

वृंदा चांदोरकर

लग्न सराई आता सुरु झाली आहे. एखादी लग्नाची पत्रिका पाहिली तर त्यात शेवटी एक वाक्य अगदी हौसेनी लिहिलेले असते. आमच्या ... लग्नाला यायचं हं..! आणि त्यात घरातल्या लहान मुलांची नावं आवर्जून घातलेली आसतात. पण ही लहान मुलांची स्पेस आपल्याकडे पत्रिकेपुरताच असते. त्यामुळे प्रत्यक्ष लग्न समारंभात मात्र लहानमुलांच्या जेवणापासून त्यांच्या झोपण्याच्या जागेपर्यंत कार्यालयात वेगळी अशी काहीच सोय दिलेली नसते. परदेशात जसे प्रत्येक ठिकाणी चाईल्ड फ्रेंडली स्पेसचा विचार केलेला असतो. तसेच आपल्याकडेही तो विचार होणे आता गरजेचे झाले आहे. यासाठी कार्यालय निवडताना, आणि केटररची मदत घेऊन आपण काही गोष्टी नक्कीच करु शकतो. ..

- कार्यालय निवडताना जसा आपण पार्किंगचा विचार करतो. तसेच लहान मुलांसाठी कार्यालयात कोणती ओपन स्पेस आहे का याचाही विचार करावा. छोटीशी बाग असेल तर उत्तमच. लग्न समारंभाच्या एवढ्या गर्दीत काही वेळा लहान मुले चिडचिड करतात. अशा वेळी त्यांना मोकळ्या हवेत नेण्यासाठी किंवा रमवण्यासाठी या जागेचा उपयोग होऊ शकतो.
- तसेच आपल्याला कार्यालयाकडून मिळणाऱ्या खोल्यांपैकी एखाद्या खोलीत आपण लहान मुलांचीच सोय करु शकतो. मुलांची झोपायची वेळ झाली की त्यांचे पालक या खोलीचा वापर करु शकतात किंवा अगदी लहान मुलाच्या आईची फिडिंगची सोय देखील या खोलीत होऊ शकेल. 
- लहान मुलांसाठी निवडलेली ही खोली थोडी कोपऱ्यात असेल तर उत्तम जेणेकरुन त्यांना आवाजाचा त्रास होणार नाही. आणि मुख्य कार्यक्रमात आपल्यालाही अडचण येणार नाही.
- लग्न समारंभात ठेवलेल्या मेन्युपैकी सर्वच पदार्थ लहान मुले खाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी नुसत्या वरणभातासाठी घेतलेल्या डिशचे देखील संपूर्ण पैसे तुम्हाला भरावे लागतात. तसेच मुलांच्या खाण्याच्या वेळा देखील लवकर असतात. अशा वेळी केटररची मदत घेऊन मुलांसाठी वेगळे काऊंटर ठेवता येईल.
- यामध्ये मेन्यु सुद्धा मऊ भात, साधे वरण, तुप असे ठेवल्यास मुलांच्या जेवण्यसाठी ते योग्य होईल.
- यासाठी मोठ्या डिश ठेवण्याची देखील गरज नाही. गरजे प्रमाणे छोट्या डीश, चमचे असे ठेवण्याची मागणी केटररकडे करता येईल.
- आजकाल आपण हॉटेलमध्ये गेल्यास मुलांसाठी स्पेशल हाय चेअर्स देतात. त्यामुळे त्यांना सगळ्यांबरोबर टेबलवर बसून जेवता येते. अशी सोय कार्यालयात एवढ्या मुलांसाठी देणे शक्य नसल्यास मुलांच्या काऊंटर शेजारीच छोट्या उंचीचा टेबल आणि खूर्च्या केररच्या मदतीने ठेवता येईल.

पुण्या मुंबईसारख्या शहरांची गोष्ट वेगळी आहे. येथे थोडीतरा सोय असते. परंतु, एकदा आम्हाला छोट्या शहरात लग्नासाठी जाण्याची वेळ आली. त्यावेळी मात्र चाईल्ड फ्रेंडली गोष्टी सोडा साध्या गोष्टींचे हायजीन सुद्धा पाळलेले नसते. अशा वेळी मुलांना देण्याच्या पिण्याच्या पाण्यापासून गैरसोय होते. त्यामुळे खरेतर कार्यालयांनीच पुढाकार घेऊन काही गाष्टी पॅकेजमध्ये दिल्यास अशा समारंभात पालकांची चांगली सोय होईल.
श्रृती अकोलकर

आम्ही एका रिसेप्शनसाठी गेलो होतो. तेथे गेल्यावर लक्षात आले की जेवणातला एकही पदार्थ लहान मुलांना देता येईल असा नव्हता. भात फडफडीत, डालतडका असल्याने ते देखील तिखट अशा वेळी आमची चांगलीच फजिती झाली. कार्यक्रम अर्ध्यातून सोडून जाणे देखील शक्य नव्हते. शेवटी एका शेजारच्या घरात आऊन आम्ही साधा वरण भात करुन घेतला. आम्हाला वेळेला मदत मिळाली म्हणून. परंतु, खरेच आपल्याकडे अश्या चाईल्ड फ्रेंडली फॅसेलिटिजचा विचार व्हायला हवा.
दर्शना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT