NDRF 
Blog | ब्लॉग

#MahalaxmiExpress : वांगणीकरांचे अभिनंदन

अतुल क. तांदळीकर

संकटात सापडलेल्याना धीर, देणं, त्यांचे प्राण वाचवणं,यासारखं दुसरं सत्कार्य नाही. ठाणे,बदलापूर जवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस मध्ये अडकलेल्या जवळपास 2000 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्याचा स्तुत्य प्रयत्न वांगणी येथील लोकांनी केला आहे.नजीकच्या अन्य गावातील काही लोकांनी देखील हे कार्य करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.वांगणीकराना यासाठी धन्यवाद आणि त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशाच्या आणि चालकाच्या धैर्याचे देखील कौतुक करायला हवे.खरं बघितले तर वाहिन्यांवर आपण सर्वांनी हे लाईव्ह प्रसारण बघितलं आहे, नौदलाचे हवाई दलाचे जवान देखील या कार्यात सहभागी असल्याचे आपण बघितले. या घटनेमुळे मात्र काही प्रश्न उपस्थित झालेत, काही प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत यातून लोकांना तर धडा घ्यावाच लागणार आहे पण प्रशासनाने देखील किती तत्पर राहायला हवे हे शिकवले आहे. भविष्यात संकटातून सुटका करून घेण्यासाठी अशा घटनांतून बोध घेता येईल.

रात्री 2 पासून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या टीम सह गावातील तरुणांनी प्रयत्न केल्याचे आपण बघितले.या परिसरातील उल्हास नदीला पूर आल्याने बदलापूर व आसपासच्या परिसरास पाण्याने वेढले आहे,पाऊस देखील सतत सुरूच आहे त्यामुळे हे बचाव कार्य मोठे आव्हानच होते.

बर्निंग ट्रेन नावाचा चित्रपट 70 च्या दशकात झळकला होता त्यात पेट घेतलेल्या धावत्या रेल्वेतील प्रवाशांच्या सुटकेचा नेमका थरार दिगदर्शकाने अप्रतिम चित्रित केला होता,महालक्ष्मी एक्सप्रेसमधील बचाव कार्य अगदी तसेच आहे, यावेळी मात्र प्रवाशाच्या प्रतिक्रीया तुन सकारात्मक वेव्ह निदर्शनास आली, त्यांनी प्रशासनावर  खापर फोडण्यापेक्षा गावातील लोकांनी केलेल्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला.नाही म्हणायला रेल्वे प्रशासनाने केलेला मदतीचा दावा देखील त्यांनी तितक्याच त्वेषाने धुडकावून लावला हे येथे अधोरेखित केलेच पाहिजे. आता जे प्रश्न निर्माण झालेत ते असे: भविष्यात अशी स्थिती कोठे कोठे निर्माण होऊ शकते ते स्पॉट आयडेंटिफाय करणार का?

जेथे पावसामुळे अशी संकटे निर्माण होऊ शकतात त्या ठिकाणी जवळपास मदत केंद्रे,यंत्रणा उभारण्याची इच्छाशक्ती दाखवणार का?कोकण रेल्वे मार्गावर हे नेहमीचेच आहे, मुंबईत देखील नित्याचेच झाले आहे,त्यामुळे बचाव कार्य करणारी तत्पर यंत्रणा सज्ज ठेवण्याचा धडा आजच घेणे केव्हाही श्रेयस्कर,अन्यथा संकट सांगून येत नाही, अशा संकटात सकारत्मक दृष्टिकोन बाळगणाऱ्या वांगणीकरांचे  आणि एनडीआरएफच्या टीम चे पुन्हा एकदा अभिनंदन।

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT