letter
letter 
Blog | ब्लॉग

... मी एक पत्र लिहिणार आहे!

मृणाल वानखेडे

जागतिक टपाल दिन नुक्ताच झाला. आमच्या पिढीला फार काही पत्रांची, पत्र लिहिण्याची ओढ नाही अस सतत म्हंटल जातं. याला कारणही आहेच म्हणा. सोशल मिडीयावर मेसेज टाईप करून पाठवणाऱ्या पिढीला पत्राची ओढ लागावी तरी कशी? 

किती वेळा आपण आयुष्यात पत्र लिहिलय? आणि लिहीलय तर का? व्यक्त व्हायला फोन असताना का बरं पत्र लिहीतो आपण? आपण... मी तरी लिहिते बाबा. स्वत:च्या अक्षराने शब्द रेखाटणारा माणुस त्यात स्वत: उतरलेला असतो. तो त्या पत्रात वास्तव्य करतो. त्याच्या भावनेचा महासागर त्या अक्षराच्या रुपाने वाचणाऱ्याच्या डोळ्यात उतरतो. इलेक्ट्राॅनिक मेसेज मध्ये ती भावना विरते. त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळते आणि त्यात प्लाॅस्टिसीटी उतरते. तंत्रज्ञान मी नाकारत नाही. त्याचा वापर मी प्रचंड प्रमाणात करते. पण पत्र संस्कृती मनापासुन जपावी वाटते.  

मला जागतिक टपाल दिवशी  फार वाटल की आज एक पत्र लिहावं, स्वत:ला लिहावं. त्यात प्रति आणि प्रेषक मीच असावं. त्यात पत्ता माझ्या मनाचा असावा. तारखे ऐवजी हे गाण असाव 'फूल तुम्हें भेजा है ख़त में फूल नहीं मेरा दिल है, प्रियतम मेरे तुम भी लिखना, क्या ये तुम्हारे क़ाबिल है' 

''किती वेळा आपण स्वत:शी संवाद साधतो?
साधलाच तर तो कशा प्रकारे साधतो?
रोज लाखो विचारांच्या विळख्यात ज्या मनाला आपण बांधतो,
त्याला एक पत्र लिहायला आपण कसं विसरतो?''

'डिअर मी' अस म्हणत का आपण त्याला संबोधत नाही? त्याला एक निरागस धन्यवाद का देत नाही? तु थोडा विश्राम कर असं आपण आपल्या मनाला का सांगत नाही? आपल मन रडतं, हसतं, खुश होतं, अनेक विचारांना सामोरं जातं, मार्ग काढतं, पडतं, आदळत पण थांबत नाही, साथ सोडत नाही.

अशा माझ्या मनाला मी एक पत्र लिहिणार आहे. मनाशी एक सुंदर संवाद साधणार आहे. मी एक पत्र लिहिणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Accident: कल्याणीनगरनंतर आता जळगाव अपघात प्रकरणी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये! बिल्डर अन् NCP जिल्हाध्यक्षांच्या मुलाला १८ दिवसांनंतर घेतलं ताब्यात

RR vs SRH : सुपर कॉम्पुटरने वर्तवला अंदाज; जाणून घ्या कोणाच्या हातात जाणार आयपीएलची ट्रॉफी

Prajwal Revanna Scandal: 'माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको...; माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णला इशारा

Pune Fire News: डोंबिवलीनंतर आता पुण्यात अग्नितांडव! महाळुंगे वाकड परिसरात दुकानांना भीषण आग

Pune Accident Viral Video : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचे शिवीगाळ करणारे रॅप साँग व्हायरल?

SCROLL FOR NEXT