MFM.jpg 
Blog | ब्लॉग

शेतकरीहिताचे फिरते शेतमाल विक्री केंद्र 

मनोहर मोगल

नाशिक : सर्व हवामानात फळे, भाज्या ताज्या राहतील, अशी व्यवस्था असलेली व्हॅन तयार करून, शेतावरील फळे, भाजीपाला या व्हॅनमधून थेट शहरातील रहिवासी भागात विक्रीसाठी पाठविला जातो. थेट ग्राहकांना विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना किफायतशीर भाव मिळतो. तसेच ग्राहकांना ताजा शेतमाल नेहमीपेक्षा कमी भावात मिळतो. अशी विक्री शेतकऱ्यांना फायदेशीर असल्याने, अशी व्हॅन खरेदी करण्यासाठी बॅंका कर्ज देतात. वाहन खरेदी करून त्यात भाजी-फळे ठेवण्याची सोय, वजनकाटा, पंखे इत्यादी सुविधांसह आठ ते नऊ लाखांपर्यंत खर्च येतो. यापैकी 75 टक्के रक्‍कम बॅंक कर्ज देते. या कर्जासाठी 11 ते 12 टक्के व्याजदर आहे. तारण म्हणून खरेदी केलेले वाहन व वैयक्तिक हमी घेतली जाते. कर्जाची परतफेड पाच वर्षांत करावी लागते. महाराष्ट्र शासनाकडून या विक्री केंद्रासाठी 15 हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध आहे. यासाठी शासनाच्या https://hortnet.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो. हे अनुदान कमी असल्यामुळेच ही योजना लोकप्रिय झाली नाही. अनुदान रक्कम दोन ते अडीच लाखांपर्यंत वाढविण्याची आवश्‍यकता आहे. 

गावातील होतकरू तरुण शेतकऱ्यांनी हा उपक्रम हाती घेऊन दररोज सायंकाळी नजीकच्या शहरातील भागात ठराविक वेळेला ताजा शेतमाल विक्रीला आणल्यास चांगला दर मिळेल. व्हॅनमधील उपलब्ध जागेनुसार आजूबाजूच्या शेतकऱ्यांचाही शेतमाल आणला तर त्यांनाही फायदा होईल. थेट ग्राहकांशी संपर्कामुळे ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन चार-पाच प्रकारच्या भाज्या शेतकरी पिकवू शकेल. या उपक्रमाबरोबरच रसायनमुक्त भाजी व फळे उपलब्ध करून दिल्यास ग्राहकांचा आणखी चांगला प्रतिसाद मिळेल. प्रत्येक रहिवासी कॉलनीत ग्राहकांना थेट ताजा शेतमाल उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक गावात निदान एका शेतकऱ्याला हा उपक्रम राबवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT