Password, PIN, keep confidential! 
Blog | ब्लॉग

पासवर्ड, पिन गोपनीय ठेवा!

अतुल कहाते

"कॅशलेस'कडे वाटचाल''

पासवर्ड, पिन हा आज-उद्याच्या "कॅशलेस' जगाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असेल. या गोष्टी गोपनीय ठेवायच्या असतात, हेच बऱ्याच जणांना माहीत नसते. यामुळे सहजपणे ते आपले पासवर्ड तसेच पिन इतरांना सांगतात. आजच्या जवळपास प्रत्येक व्यवहाराच्या वेळी आपल्याला पासवर्ड किंवा पिन लागतोच. उदाहरणार्थ, आपण क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून दुकानात खरेदी केली किंवा पेट्रोल भरले, तर तिथल्या माणसाने आपले कार्ड त्याच्याकडच्या यंत्रामध्ये "स्वाइप' केल्यानंतर आपल्याला आपला "पिन' भरावा लागतो. अनेकदा लोक आपला "पिन' सरळ त्या माणसालाच सांगतात आणि तो माणूस आपल्या वतीने त्या यंत्रात आपला "पिन' भरतो.

हे अत्यंत धोकादायक आहे. याचे कारण म्हणजे आपल्या कार्डावरचे तपशील अशा ठिकाणी काम करणारा चाणाक्ष माणूस लक्षात ठेवू शकतो. याच्या जोडीला आपण आपला "पिन'ही त्याला सांगितला, तर आपल्या कार्डाची सुरक्षितता पूर्णपणे नष्ट होऊ शकते. तो माणूस या सर्व माहितीच्या आधारे आपल्या कार्डाचा गैरवापर करू शकतो. हाच प्रकार फोनवरूनही घडतो. सर्वसामान्य लोकांना भामटे फोन करून त्यांच्याकडून एटीएम किंवा डेबिट वा क्रेडिट कार्डांचे तपशील, पिन, मोबाईलवर येणारे वन टाइम पासवर्ड (ओटीपी) अशी माहिती घेतात. यासाठी आपण बॅंकेचा अधिकारी असल्याची बतावणी ते करतात; किंवा फोनवरून पलीकडच्या माणसाला कसले तरी बक्षीस लागले असल्याची आणि त्यासाठी ही माहिती आवश्‍यक असल्याची थाप मारतात.

लोक भीती किंवा हाव यापोटी ही माहिती सहजपणे देतात. आपला पासवर्ड, पिन आणि ओटीपी कधीही, कोणालाही सांगू किंवा दाखवू नका आणि मग "कॅशलेस' व्यवहार बिनधोकपणे करा! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eleventh Admission : आजपासून अकरावीची पहिली विशेष फेरी; पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक ६ जुलैला होणार जाहीर

'इतकं घाणेरडं गाणं...' शाहरुख-ऐश्वर्याच्या आयकॉनिक गाण्याचा रिमेक पडला महाग, हुमा कुरेशी ट्रोल

Vat Purnima 2026 : सात जन्मच काय; पण एक क्षणही पत्नी नको! पत्नी पीडितांची आगळीवेगळी 'पिंपळ पौर्णिमा', झाडाला घातल्या 108 उलट्या प्रदक्षिणा

Thane News : आता ऑपरेशन टायगर- ३? ठाकरेंचे १४ आमदार फोडण्याची तयारी, ८ जुलैला पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात कोर्ट आज निर्णय देणार

SCROLL FOR NEXT