reading 
Blog | ब्लॉग

वाचू आनंदे...

सर्जेराव नावले

   सुपीक जमिनीत सकस पीक उगवते, जमीन सुपीक, चांगल्या पोताची होण्यासाठी जशी मशागतीची आणि नांगरटीची गरज असते, तसेच सशक्त मेंदूत चांगल्या विचारांचे पीक येण्यासाठी मानवी मनात पुस्तके नांगरटीचे काम करतात. ही पुस्तकांच्या वाचनांची नांगरट किंवा मशागत मानवी मनात सातत्याने करावी लागते. ‘पुस्तकेच सशक्त मस्तके घडवितात’ असेच म्हटले जाते ते यामुळेच. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगाने आणि सोशल मीडियाच्या जंजाळात मानवी मनाला किंबहुना प्रत्येकाला गुरफटून टाकले आहे. जो- तो तासन्‌तास मोबाईलमध्ये मस्तक घालून बसल्याचे चित्र जेथे-तेथे पाहायला मिळते. अलीकडे वाचणाऱ्यांची संख्या कमी झाल्याची ओरड होत असली तरी दुसऱ्या बाजूला तरुणाई ‘वाचते व्हा’ असा आनंद पेरत ‘आम्ही वाचनाळू’ असाही संदेश देत आहे. वाचन चळवळीचा कानोसा घेतला असता हे ‘वाचू आनंदे’ असे सकारात्मक चित्र दिसते.

तरुणाई वाचते, वाचत राहते, याचा अनुभव प्रकर्षाने जाणवण्याचे कारण दहा वर्षांपूर्वी ‘दुनियादारी’ हा मराठी चित्रपट यशस्वी ठरला. ज्येष्ठ लेखक सुहास शिरवळकर यांच्याच दुनियादारी कांदबरीवर बेतलेला चित्रपट. या चित्रपटाची कलाकृती तरुणाईने डोक्‍यावर घेतली. चित्रपटाच्या यशानंतर शिरवळकरांची ३५ वर्षांपूर्वीच्या दुनियादारी कादंबरीने एका रात्रीत विक्रीचा उच्चांक केला. चित्रपट पाहणाऱ्या तरुणाईला मूळ कादंबरी वाचनाचा मोह आवरला नाही. दरम्यानच्या काळात चारूता सागर यांच्या ‘दर्शनकथा’ आणि प्रा. डॉ. राजन गवस यांच्या ‘चौंडक’, ‘भंडारभोग’ या साहित्यकृतीवर तयार झालेल्या ‘जोगवा’ असो अथवा डॉ. आनंद यादव यांच्या नटरंग कांदबरीवर बेतलेला ‘नटरंग’ चित्रपट असो. या चित्रपटाच्या कलाकृती अजरामर ठरल्या. या चित्रपटानंतर मूळ संहिता वाचनाची ओढ आणि उत्कंठा तरुणाईत मोठ्या प्रमाणात तयार झाली.

एखाद्या साहित्याला पुरस्कार मिळाला, की ती साहित्यकृतीही रातोरात चर्चेत येते. तरुण लेखक ऐश्‍वर्य पाटेकर यांच्या ‘ज्यू’ आणि नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या पुस्तकाच्या वर्ष-दीड वर्षात सातव्या, आठव्या आवृत्त्या संपल्याची उदाहरणेही वाचन चळवळ अधिक समृद्ध करणारी ठरते. आजही सुधा मूर्ती यांचे ‘वाईज ऑदरवाईज’साठी वेटिंग करावे लागते. किरण बेदी यांचे ‘आय डेअर’, पोलिस अधिकारी विश्‍वास नांगरे-पाटील यांचे ‘मन मे है विश्‍वास’ या पुस्तकाचं गारूड कायम आहे. करिअर आणि जीवनात काही तरी करूया या आशेने मुसमुसलेल्या तरुणाईत स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची विशेष आवड निर्माण झाली आहे. दुसऱ्याच्या पावलावर पावले ठेवण्याच्या प्रयत्नात व्यक्तिचरित्रे वाचण्यातही महाविद्यालयीन तरुणाई आजही मागे नाही. अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनाची सवय लावून घेण्यात तरुणाई पुढाकार घेतल्याचे चित्र चळवळीला देणारे बळ निश्‍चितच सकारात्मक दिसते.

या पुस्तकांचे गारुड कायम

मन मे है विश्‍वास  - विश्‍वास नांगरे - पाटील
आय डेअर - किरण बेदी
वाईज- ऑदरवाईज - सुधा मूर्ती
महानतेच्या दिशेने - राबिन शर्मा (अनुवादित)
मृत्युंजय - शिवाजी सावंत
स्वामी - रणजित देसाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Warren Buffett: वॉरेन बफेंसारखी गुंतवणूक करायला शिका; कमवाल करोडो रुपये, काय आहे त्यांची स्ट्रॅटेजी?

HBD MS Dhoni: एमएस धोनीच्या नावावर असलेले असे ५ रेकॉर्ड जे मोडणं कोणालाही आहे महाकठीण

Chandrakant Patil: पुणे पोलिस दलात लवकरच एक हजार जणांना घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

11th Class Admission: अकरावीच्या प्रवेशासाठी आज अखेरची संधी; ३२ हजार विद्यार्थ्यांनी निश्चित केला प्रवेश

Solapur News: 'मुख्यमंत्र्यांसमवेत कल्याणशेट्टी अन्‌ मानेंची चर्चा'; माजी खासदार थांबले काही अंतरावर, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT