युद्धकला आणि खेळ.jpeg 
Blog | ब्लॉग

युद्धकला आणि खेळ 

लेखिका : विजयालक्ष्मी मणेरीकर

     आता जर आपण जागतिक स्तरावरचे खेळप्रकार बघितले, तर त्यात याचमुळे सूत्र कसे काम करते, हे आपल्या लक्षात येईल. क्रिकेट, फुटबॉल, हुतूतू, बॅडमिंटन, टेनिस, कुस्ती, कबड्डी, खो- खो किंवा बुद्धिबळ कोणताही खेळ घ्या, या सर्व खेळांमध्ये दोन विरुद्ध संघ, जिंकण्याची ऊर्मी आणि चीतपट हीच बलस्थाने असतात. अगदी स्वतःच्या आनंदासाठी रोज बॅडमिंटन कोर्टमध्ये जाऊन बॅडमिंटन खेळणारी व्यक्ती असो किंवा शाळेत खेळांमधील मैदानी खेळ खेळणारे विद्यार्थी असो, शेवटी उद्दिष्ट काय तर जिंकणे, मात करणे, स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवणे.आपल्या संवेदनशील मनाला पटो अथवा न पटो "युद्धकला' हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. ती जन्मजात आहे आणि बिनदिक्कतपणे आपण येणाऱ्या पिढीलाही उत्साहाने, आत्मीयतेने शिकवतोच हे विसरता कामा नये. भारतीय प्राचीन खेळांची काही उदाहरणे पाहूयात. केरळचा कल्लरीपयटू, तमिळनाडूचा सिलंबम, महाराष्ट्रातील शिवकालीन युद्धकला (मर्दानी खेळ) ज्यात दांडपट्टा, काष्टयुद्ध, तलवारबाजी या युद्धकलांचा समावेश आता क्रीडा आणि शिक्षण विभागाने शालेय स्तरावर केला आहे आणि विद्यार्थीही विशेष उत्साहाने त्यात पारंगत होत आहेत. 

     ग्रीक लोकांच्या वैभवकाळात त्यांचे ऑलिंपिक, नेमियन, पायथियन, हस्थमियन इत्यादी सामने होत. भारतात प्राचीन वैदिक काळात तसेच रामायण, महाभारत काळात द्युत, फासे, कुस्ती, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती आदी खेळ प्रचलित होते, असे संदर्भ येतात. भारताप्रमाणे इजिप्त, जपान, चीन या देशांतही सोंगट्या, गंजीका, बुद्धिबळ यांसारखे खेळ पुरातन काळापासून सुरू होते. खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. जीवन हेच मुळी क्रीडांगण आहे. ज्यात प्रत्येक व्यक्तीला आपला खेळ खिलाडूवृत्तीने खेळावा लागतो. युद्धकलेचा आणि खेळ यांचा परस्पर संबंधित आढावा घेण्याचे कारण म्हणजे जेव्हा आपण संस्कृतीविषयी चिंतन करतो, तेव्हा अतिशय खेदाने सांगावेसे वाटते, की माणुसकी म्हणजे अस्तित्वाचा संघर्ष आणि तो युद्धकलेशी निगडित आहे. 

     आजच्या युगातही त्याची झलक सातत्याने नजरेस येते. रोजच्या जीवनातील व्यक्तिगत संघर्षापासून अगदी "जेएनयू'मधील विद्यार्थी आंदोलने असो अथवा कश्‍मीरमधल्या दहशतवादी कारवाया, नक्षलवादी हल्ले असो किंवा सनातनी संघटनांचे अतिरेकी हल्ले असो सगळं काही स्वतःचे वर्चस्व आणि अस्तित्व सिद्ध करण्यासाठीच. Competition is a sin. Own nothing. Control everything. - जॉन डी. रॉकफेलर यांच्या या व्याख्येचा संदर्भ घेऊ शकतो. कधी एखादा अभिमन्यू घडतो, तो चक्रव्यूहात अडकतो आणि मृत्युमुखी पडतो, तर कधी कोणी अर्जुन बनून युद्धनीतीचे तत्त्व जगाला कळावयास निमित्तमात्र ठरतो. तर हल्ली एकलव्य खूपच बघायला मिळतात. जे अप्रत्यक्षपणे या कलांमध्ये पारंगत होतात. युद्ध, त्यातून घडणारा विनाश व होणारी दुःखनिर्मिती वारंवार अनुभवूनसुद्धा मनुष्यप्राणी अजून शांततेने जगण्यास शिकलेला दिसत नाही. संघर्षग्रस्त मन हे दुसऱ्यांच्या बाबतीत नेहमीच असंवेदनशील असते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT