reading sarjerav navale blog 
Blog | ब्लॉग

दोन दशकांचं अखंडित नित्य वाचन...

सर्जेराव नावले

     ‘वाचाल तर वाचाल’ हा वाचन चळवळीला बळकटी देणारा संदेश रुजविण्याचा वर्षानुवर्षे प्रयत्न सुरू असतानाच शालेय विद्यार्थ्यांत वाचनाची गोडी लागावी, थोरांच्या चरित्र वाचनातून त्यांचे विचार विद्यार्थ्यांनी अंगिकारावेत आणि त्यांच्या विचारातून जीवनाला प्रेरणा मिळावी, अशा उद्देशातून शाळेत नित्य वाचन उपक्रम घेऊन या उपक्रमाद्वारे वाचनाचा अनोखा ‘ज्ञानयज्ञ’ गेली वीस वर्षे अखंड सुरू आहे. पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) येथील नवनाथ हायस्कूलमध्ये राबविला जाणारा हा ‘नित्य वाचना’चा आदर्श उपक्रम विद्यार्थ्यांसाठी वेगळी आणि प्रेरणादायी पायवाट तयार करणारा आहे.

हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत निकाडे यांच्या प्रेरणेने आणि अन्य शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अभ्यासक्रमाबरोबरच स्वयंस्फूर्तीने हा नित्य वाचनाचा उपक्रम दरवर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सलग ४५ दिवस शाळेत राबवतात. यात सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी सहभागी होतात. 
जानेवारी महिन्यात प्रार्थनेवेळी संविधान वाचन आणि राष्ट्रगीतानंतर रोज २० मिनिटे सर्व विद्यार्थ्यांसाठी सामूहिकपणे ‘नित्य वाचन’ घेतले जाते. वाचन करणारा विद्यार्थी व्यासपीठावरून चरित्र वाचन सुरू करतो. अन्य विद्यार्थी त्यातील ठळक मुद्दे लिहून घेतात. लेखिका वीणा गवाणकर यांच्या ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तक वाचनातून हा उपक्रम सुरू झाला.

आजअखेर संत विचारांचे संकलन, माझे सत्याचे प्रयोग (महात्मा गांधी), अग्निपंख (माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम), छत्रपती शिवाजी महाराज (इंग्रजी पुस्तक) आदी पुस्तकांचे वाचन झाले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी थोरांच्या विचारांचा जागर केला आहे. ४५ दिवसांचे ‘नित्य वाचन’ फेब्रुवारीपर्यंत चालते. या वाचनावर आधारित विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. दोन गटांत या परीक्षेतील विजेत्यांना बक्षिसे दिली जातात. विजेत्या विद्यार्थ्यांना पुस्तक स्वरूपातच बक्षिसे दिली जातात. ज्या लेखकांचे चरित्र वाचन होते, त्या लेखकाला शाळेत आणण्याचाही प्रयत्न केला जातो. यातून सुनीलकुमार लवटे, चंद्रकुमार नलगे, सदानंद कदम आदी लेखकांनी शाळांना भेटी दिल्या आहेत. उपक्रमात ज्या लेखकाचे साहित्य वाचले त्या लेखकाला प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थीही भारावून जातात. कार्यक्रमास आलेल्या लेखकांसोबत विद्यार्थी प्रश्‍न-उत्तरे करण्यात रममाण होतात. विशेषतः संबंधित लेखकाने लिहिलेल्या पुस्तकांवर चर्चा करण्याची संधी सर्व विद्यार्थ्यांना मिळते.

आजच्या टीव्ही आणि मोबाईलच्या जमान्यात आणि मुलांत पबजी आणि  मोबाईलमधील गुरफटणाऱ्या गेमच्या वेडात नवनाथ हायस्कूलचा हा ‘नित्य वाचन’ उपक्रम विद्यार्थीदशेत वाचन चळवळीला बळ देणारा तर आहेच; पण अशा प्रकारचा हा उपक्रम अन्य शाळा आणि विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरणारा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT