Blog | ब्लॉग

चंद्र-शुक्र विलोभनीय युती 

अमित पुरंदरे

सध्या गेला आठवडाभर पश्चिमेला सायंकाळच्या आकाशात सूर्यास्तानंतर चंद्र-शुक्र विलोभनिय युती दिसत आहे. चंद्र आणि शुक्र हे पृथ्वीच्या आकाशात दिसणारे सूर्या नंतरचे अनुक्रमे दोन आणि तीन क्रमांकाचे तेजस्वी खगोल आहेत. अशीच विलोभनीय युती  28 जानेवारीला सायंकाळी ०७:५० वाजता पुण्यामधून दिसली. या दिवशी निरीक्षकाच्या दृष्टीने चंद्र-शुक्र यांच्यामधील पूर्व-पश्चिम अंतर कमी झाले होते. खगोलशास्त्रामध्ये या घटनेला 'युती' असे संबोधतात. या घटनेत पृथ्वी वरून निरीक्षण करताना दोन किंवा अधिक खगोल एकमेकांच्या जवळ आल्यासारखे दिसतात. वास्तवात या खगोलांमधले अंतर हे प्रचंड असते. 

28 जानेवारीला चंद्र-शुक्र हे साधारणपणे एकमेकांपासून तीन अंशावर होते. वास्तवात चंद्र हा पृथ्वी पासून साधारणपणे ३ लाख ८५ हजार किलोमीटर तर, शुक्र हा ग्रह अंदाजे ३८ मिलियन किलोमीटर वर आहे. सदर छायाचित्रामध्ये चंद्राची प्रकाशित आणि अप्रकाशित अशा दोन्ही बाजू दिसत आहे. चंद्राची जी बाजू प्रकाशित दिसत आहे, तिथे दिवस असून तेथे पडलेला सूर्यप्रकाश आपल्याकडे परावर्तित झाल्यामुळे आपल्याला ती बाजू दिसत आहे. तर त्याच्याच वरच्या बाजूला असणारी काहीशी अंधारी बाजू ज्याला खगोलशास्त्रिय परिभाषेत " अर्थ शाईन " (Earth Shine)असे म्हणतात, ही सूर्यप्रकाश आणि पृथ्वीच्या अंधाऱ्या बाजूच्या मानवनिर्मित दिव्यांच्या प्रदूषणाचा प्रकाश हे एकत्रितपणे पृथ्वीच्या वातावरणामधून चंद्रावर परावर्तित झाल्यामुळे दिसत आहे. साधारणपणे प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत  'अर्थ शाईन' व्यवस्थितपणे दिसते व त्याची सुंदर छायाचित्रे देखील घेता येतात. पृथ्वीवरून निरिक्षकाला चंद्रा ची कायम एकच बाजू दिसते. 

शुक्र हा कमालीचा तेजस्वी दिसत असल्यामुळे त्याला शुक्र तारा किंवा शुक्रा ची चांदणी म्हणतात पण हे चूकीचे आहे. शुक्रा च्या वातावरणामधील प्रकाश परावर्तित करणाऱ्या ढगांमुळे शुक्रा ला मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या जवळ जवळ ८० टक्के प्रकाश हा अंतराळात परावर्तित केला जातो आणि आपल्याला अंतराळात चंद्रा नंतर सर्वात जवळ असणारा खगोल शुक्र च असल्यामुळे आपल्या आकाशात शुक्र एखाद्या ताऱ्याप्रमाणेच तेजस्वी दिसतो. शुक्र हा ग्रह आहे हे निरीक्षकांनी लक्षात घ्यावे. 28 जानेवारी रोजी दिसलेली 'चंद्र-शुक्र' युती एवढी देखणी व विलोभनिय होती की, पुणे शहरा सारख्या झपाट्याने विस्तारणाऱ्या महानगरामधील मानवनिर्मित दिव्यांचे प्रदूषण देखील या नैसर्गिक खगोलीय घटनेचा आनंद घेण्यापासून पुणेकरांना रोखू शकले नाही.

अमित पुरंदरे, खगोलशास्त्र अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT