Valentines Day Special : अन् ते बनले खऱ्याखुऱ्या आयुष्यातले विठ्ठल - रुक्माई....  
Blog | ब्लॉग

Valentines Day Special : अन् ते बनले खऱ्याखुऱ्या आयुष्यातले विठ्ठल - रुक्माई....

प्रतिनिधी

      शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागात त्यांनी प्रवेश घेतला. डिपार्टमेंटचा पहिला दिवस, सर्वजण एकमेकांच्या ओळखी करून घेत होते. सहाजिकच आपापले मोबाइल नंबरही देत घेत होते. त्याचप्रमाणे त्यानेही तिला नंबर मागितला. तिने त्याचा मोबाईल घेऊन स्वत:चा नंबर डायल केला आणि थांबली.... सॉरी, मी नाही नंबर देऊ शकत...  मी मोबाईल वापरत नाही. हा नंबर माझ्या घरचा आहे...(ती त्यावेळी मोबार्ईल वापरत नव्हती) असं ती म्हणाली.. त्याला ते मुळीच आवडलं नाही. मग त्यानेही मनाशी ठरवलं. ही आज आपल्याला मोबाईल नंबर देत नाही, पण याच मोबाईल नंबरसह तिलाच आपलेसे करायचं... तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, तिनेही  त्याच्या मनातलं जाणलं होतं. पण ती फारसा प्रतिसाद देत नव्हती. ती त्याच्याशी फटकून वागू लागली. कशाच्या तरी निमित्ताने तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. पण ती त्याला दाद देत नव्हती. पाच सहा महिने असेच गेले. तिने त्याच्या जवळच्या मित्रांना सांगितले त्याला समजावून सांगा. तो एवढ्या लांबून येथे शिक्षणासाठी आला आहे. त्याला अभ्यासावर लक्ष दे म्हणावं.. तोही जिद्दी होता. त्याने पुढील काही दिवस फक्त अभ्यास आणि अभ्यासच केला. जानेवारीमध्ये पहिल्या सेमिस्टरचा निकाल लागला. तिच्या अपेक्षेप्रमाणे त्याचा दुसरा क्रमांक आला. ती मनातून खूप आनंदी होती. पण तिने चेहऱ्यावर दाखवून दिले नाही.

निकालाच्या तिसऱ्या दिवशी तो तिला विद्यापीठाच्या मुख्य गेट वरती (नेहमीप्रमाणे) सोडायला गेला. त्यावेळी ती त्याला स्पष्ट बोलली. मला तुझ्या मनात काय चाललय ते माहित आहे पण मला हे शक्य नाही. मी हे करू शकत नाही. तुझं माझ्यावर प्रेम असेल आणि तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझा होकार आहे. पण मला प्रेम वगैरे या गोष्टी जमणार नाहीत. तुला ज्या वेळेस लग्न करायच आहे त्यावेळेस तू माझ्या घरी माझ्या वडिलांकडे याविषयी बोल. त्यांनी होकार दिला तरच मी लग्न करेन... पण इतर प्रेमीयुगुलांसारखं हॉटेल, पिक्चर, एस.एम.एस, फोन या गोष्टी मला जमणार नाहीत. असं असेल तरच माझा होकार आहे.... प्लीज आता तरी अभ्यासाकडे लक्ष दे.... जी प्रगती झाली ती टिकवून ठेव... असे म्हणून तिने त्याच्याकडे बघून स्माईल दिली आणि ती निघून गेली. तो खूप आनंदी होता. त्याने आनंदाने लगेच ही गोष्ट मित्रांना सांगितली. आणि तिथून सुरू झाली यांची प्रेम कहानी.....

नाही म्हणत म्हणत चहा पिणे, रोज डिपार्टमेंट वरून गेट पर्यंत सोडायला जाणं, या गोष्टी सुरु झाल्या. एक दिवशी तो तिला सांगू लागला की माझ्या गावाकडे अशी परिस्थिती आहे तशी आहे. त्यावर ती बोलली मला तुझ्या परिस्थितीशी, तुझ्या शेतीशी काही घेणे-देणे नाही. मला तू महत्त्वाचा आहे. मी तुझ्याकडे पाहून प्रेम केलं. या दोघांची स्वच्छ आणि निर्मळ प्रेमाची कहाणी येथे सुरु झाली. विभागांमध्ये पारंपारिक दिवसानिमित्त हे दोघेजण विठ्ठल रुक्माई झाले होते. विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी पालखी सोहळा काढला होता. त्यावेळेस कोणालाही वाटलं नव्हतं की हे खऱ्याखुऱ्या आयुष्यात विठ्ठल रुक्माई होऊ शकतील.   अचानक तिच्या घरात लग्नाचा विषय निघाला. दोघांनीही ठरल्याप्रमाणे एका सरांना मध्यस्थी घालून हे स्थळ तिच्या घरी नेलं. सरांनीही अरेंज मॅरेज पद्धतीने तिच्या वडिलांना त्यांच्या नात्याबद्दल पटवून सांगितलं.  मुलाला पाहून तिचे वडीलही खूप आनंदी झाले. त्यांनी निर्धार केला की आपल्या मुलीचं लग्न केलं तर याच मुलाशी करायचं. त्यांनी मुलाच्या गावाकडे बोलावणं पाठवलं. त्याच्या गावाकडची मंडळी तिच्याकडे आली. घरात पाऊल टाकताच समोर लावलेली 200 ते 300 शिल्ड पाहून त्याचा काका म्हणाले, बस अशीच कर्तृत्ववान मुलगी आपल्या मुलासाठी पाहिजे होती. असं सहजासहजी मिळत नाही यासाठी खूप संस्कार आणि कष्ट लागतात. ठरल्याप्रमाणे मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला आणि त्या दोघांचं लग्न झालं. आज तो पत्रकार आहे तर ती आकाशवाणीमध्ये निवेदिका आहे. दोघांच्या प्रेम प्रयत्नांनी आज धनाजी आणि पूजा यांचा खऱ्याखुऱ्या आयुष्यातला विठ्ठल - रुक्माईचा जोडा बनला आहे... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ना भाषा आडवी आली, ना अंतर! आफ्रिकेतील विद्यार्थ्यांनी सादर केला प्रतापगडाचा 'तो' ऐतिहासिक प्रसंग; VIDEO व्हायरल

Turkey Climate Summit : युरोपात उष्णतेची लाट, नेपाळमध्ये महापूर अन् जगासमोर ऊर्जा संकट; हवामान बदलाचा सामना करण्यासाठी तुर्कीयेत जागतिक नेते एकवटले

Latest Marathi News Live Update : लोहारा येथे महिला घरात मृतावस्थेत आढळली; परिसरात हळहळ

उद्या मंगळाचं नक्षत्र परिवर्तन! ५ राशींचं नशीब पालटणार; आर्थिक परिस्थिती सुधारणार, करिअरमध्येही मोठी प्रगती

Yavatmal Student News : मुंबईतील हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, कुटुंबीयांचा दोन महिन्यांपासून पाठपुरावा; आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT