स्वप्न पूर्ण होऊ शकतात!  
Blog | ब्लॉग

स्वप्न पूर्ण होऊ शकतात!

व्यंकटेश कल्याणकर

इमारत बांधण्याचे काम करणारे एक कुटुंब कामानिमित्त सतत वेगवेगळ्या शहरात प्रवास करत होते. पती, पत्नी आणि एक लहान मुलगा असे त्यांचे कुटुंब होते. लहान मुलगा जेथे वास्तव्य असेल तेथे शाळेत जात असे. साधारण एक काम वर्षभर चालत होते. त्यामुळे प्रत्येक वर्षी मुलाला शाळा बदलावी लागत होती. तो लहान मुलगा एकदा शाळेत गेल्यावर त्याला "माझी स्वप्ने' या विषयावर शिक्षकाने निबंध लिहिण्यास सांगितले. त्यानंतर त्या मुलाने तब्बल पाच पानांचे स्वप्न लिहिले. त्यामध्ये आपल्याला बिल्डर व्हायचे आहे, असे स्पष्ट लिहिले होते. आपला पहिला प्रकल्प कोठे असेल? आपल्या कार्यालयाची जागा कशी असेल? किती लोकांना आपण कामावर ठेवणार? याची सविस्तर माहिती त्याने पाच पानात लिहिली होती. सर्व मुलांनी आपापले निबंध जमा केले.

काही दिवसांनी शिक्षकाने सर्व निबंध तपासले आणि विद्यार्थ्यांना परत केले. या मुलालाही त्यांनी निबंध परत केला. त्याच्या निबंधावर शिक्षकाने फुली मारली होती. त्यावर मुलाने विचारणा केली, "मी माझी स्वप्ने लिहिली आहेत. तुम्ही त्यावर फुली का मारलीत?' त्यावर शिक्षक म्हणाले, "अरे, तुझ्याकडे पैसे नाहीत. स्वत:चे घर नाही. काहीही नाही आणि त्यामुळे तुझी स्वप्ने अवास्तव आहेत. जरा वास्तव स्वप्ने लिहिण्याचा प्रयत्न कर.' हे ऐकून तो मुलगा नाराज झाला.

मुलाने "माझी स्वप्ने' या विषयावर निबंध लिहिला. शिक्षकाने "ही स्वप्ने अवास्तव आहेत' असे सांगितले. काय झाले पुढे? वाचा विद्यार्थ्याने निबंध लिहिला

शाळा सुटल्यावर घरी येऊन त्याने वडीलांना निबंध दाखवला आणि शिक्षकाची प्रतिक्रिया सांगितले. वडीलांना तो म्हणाला, "मी बिल्डर कधीच होऊ शकणार नाही का?' त्यावर वडील म्हणाले, "बाळा, तुझी स्वप्ने अजिबातच अवास्तव नाहीत. तू किती विचार करून व्यवस्थितपणे निबंध लिहिला आहेस. तुझी स्वप्ने योग्य आहेत. या जगात कोणतीही स्वप्ने पाहण्यापासून कोणीही कोणाला रोखू शकत नाही. शिक्षकाला तुझी परिस्थिीती माहिती आहे, त्यामुळे त्यांनी तुला वास्तवाची जाणीव करून दिली. पण, बाळा लक्षात ठेव. आज ही स्वप्ने तू कागदावर लिहून ठेवली आहेस. ती तशीच कागदावर ठेवू नकोस. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्राणपणाने काम कर. प्रयत्न कर. स्वप्न हा तुझा श्‍वास बनव. अशक्‍य शक्‍य करून दाखव. जगात काहीही अशक्‍य नाही. फक्त आपण पुरेसे प्रयत्न करण्यात मागे पडतो. बाळा! लक्षात ठेव अनेक पावले पुढे जाण्यासाठी आधी एक पाऊल पुढे जावे लागते. आज घडीला तुला तुझ्या स्वप्नापर्यंत पोचण्यासाठी अभ्यास करणे आवश्‍यक आहे. प्रत्येक वेळी ठरव की आता पुढील पाऊल काय आहे? हळूहळू तुझे तुलाच समजू शकेल की पुढील पाऊल काय आहे ते!'

हे ऐकून मुलाच्या मनात विश्‍वास निर्माण झाला की, आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT