saturday story by Vyankatesh Kalyankar 
Blog | ब्लॉग

विश्‍वास फक्त...! (बोधकथा)

व्यंकटेश कल्याणकर

एका सहा वर्षाच्या मुलासोबत त्याचे बाबा खेळत असतात. दोन मजली घराच्या गच्चीवर दोघे जण खेळत असतात. खूप वेळ खेळल्यानंतर बाबा अचानक म्हणतात. "चल आपण एक नवा खेळ खेळू.' मुलगाही "हो' म्हणतो. "येथेच थांब' असे सांगत बाबा निघून जातात. ते खाली अंगणात येतात. मुलाला आवाज देऊन गॅलरीत बोलावतात. मुलगा येतो. बाबा म्हणतात, "आता तेथून खाली उडी मार. मी तुला खाली पकडतो.' मुलगा खूप घाबरतो. तो म्हणतो, "नको बाबा. मी पडेल. मला लागेल. मला खूप भीती वाटते.' तरीही बाबा हट्ट सोडत नाहीत. "उडी मार मी पकडतो' असे म्हणत बाबांनी दोन्ही हात उंच करत पकडण्याचा विश्‍वास देतात. मुलगा खूप भीत होता. बराच वेळाने मुलगा तयार झाला. त्याने एक अट घातली. अटीप्रमाणे बाबांनी खाली जमिनीवर गादी आणून टाकली. मुलगा म्हणाला, "मी उडी मारतो. पण पडलो तर या गादीवर पडेल' बाबा म्हणतात, "हो, मी तुला पकडतो.'

खूप वेळ बाप-लेकात चर्चा होते. मुलाने अखेर उडी टाकण्याचा निर्णय घेतो. "पकडाल ना? नाहीतर मी पडेल!', मुलगा शेवटची सूचना करतो. "हो, रे. तू मार उडी', असे म्हणत बाबा पुन्हा एकदा विश्‍वास देतात. मुलगा उडी मारू लागतो. तेवढ्याच पुन्हा तो म्हणतो, "पण, पकडाल ना?' त्यावर "हो, रे तुझा बाबा आहे ना मी. विश्‍वास नाही का माझ्यावर?' असे म्हणत बाबा मुलाला पुन्हा प्रेरित करतात. अखेर मुलगा बाबा पकडतील या विश्‍वासाने उडी मारतो. बाबा अगदी सहजपणे मुलाला पकडू शकणार असतात. पण मुलगा जसा जवळ येऊ लागतो तसे बाबा दोन्ही हात काढून घेऊन दूर होतात. मुलगा गादीवर पडतो. त्याला थोडेसे खरचटते. तो खूप रडू लागतो. त्याला बाबांचा खूप राग येतो. तो आईला आवाज देऊ लागतो. आई धावत येते. त्याला घरात नेते. मुलगा बाबांशी अबोला धरतो. रात्र होते. मुलगा झोपून जातो.

दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेजण भेटतात. वडिल म्हणतात, "हे बघ. मी तुला आता सांगणार आहे की मी तुला का पकडले नाही.' "का नाही पकडले?', मुलाचीही उत्सुकता ताणते. बाबा म्हणतात, "हे बघ, हे जग चांगल्या माणसांनी भरलेले आहे. तेवढेच या जगात वाईट माणसेही भरलेली आहेत. मात्र, आयुष्यात कधी कोणावरही विश्‍वास ठेऊ नकोस. अगदी स्वत:च्या बापावर सुद्धा. फक्त स्वत:वर विश्‍वास ठेवायचा. फक्त स्वत:वर.' वडिलांचा हा संदेश ऐकून मुलगा वडिलांच्या गळ्यात पडतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT