eSakal blog mumbai local harshada parab 
Blog | ब्लॉग

लिपस्टीक 

हर्षदा परब

डोंबिवलीत ट्रेनमध्ये शिरल्यावर त्यांनी जागा पकडल्या. त्यानंतर त्यांचं बोलणं सुरू होतं. त्या प्रत्येक वेगळ्या विषयांत त्यांच्या ब्युटी प्रॉडक्टबद्दल चर्चा व्हायची. विषय नोकरीचा असेल तर ऑफिसातल्या बायका कशा आणि कुठल्या शेड्स वापरतात. काही साईट ऑफिसमध्ये बंद आहेत, या वाक्यानंतर ब्युटी प्रॉडक्टची नवीन साईट मला कळलीय...तिथे जास्त कन्सेशन मिळतं...हे आणि असंच.

पहिली मुलगी: मी xxx ब्रॅण्डची लिपस्टीक मॅटमध्ये शोधतेय.

दुसरी मुलगी: अमुक ठिकाणी चांगली मिळेल.

पहिली मुलगी: मी xxxx ऐवजी yyyy ब्रँडची लिपस्टीक बघत होते पण...ती xxx ब्रँडमध्ये चांगली आहे. मी घेतली एकदा लावली तर ओठ ड्राय झाले. रात्री लिपस्टीक काढली तर दोन दिवस ओठ झोंबत होते. बहुतेक मॅट लिपस्टीकमुळे ओठ ड्राय होतात; पण याने जास्त त्रास झाला.

ती सांगत होती, ऑफिसात सर्वजणी तशीच लिपस्टीक लावतात पण त्यांना त्रास होत नाही...बहुधा त्या लिपस्टीकमुळे त्यांच्या ओठांचं सेन्सेशन खराब झालं असणार म्हणून त्यांना त्रास होत नाही...

दुसरी मुलगी: अग मॅट लिपस्टिक लावायच्या आधी मॉश्चरायजर लावायचं...

पहिली मुलगी: लावलं होतं.

दुसरी मुलगी: लिपस्टीक लावल्यानंतर पण लावायचं.

पहिली मुलगी: लावलं होतं तरी ओठ जळजळले...

बापरे, त्यानंतर पुन्हा त्या वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या स्वस्तातल्या लिपस्टिक ऑनलाईन शोधत होत्या आणि स्वस्तातल्या लिपस्टीकबद्दल बोलत होत्या. 

मला थोडा वेळ वाटलं का एवढा अट्टाहास? लिपस्टिक नाही परवडत तर नका लावू किंवा महागडी एखादीच लिपस्टिक ठेवा ज्याने त्रास नाही होणार. पण सुंदर दिसण्यासाठी केवढा हा स्वतःशी खेळ. त्या तिघी एकाच बॅचच्या इंजिनिअर होत्या. त्यांच्या बोलण्यावरुन ते लक्षात येत होतं. 

इंटर्नशिप करत होत्या. 

एक क्षण वाटलं अशी एकादी लिपस्टिक असती जी लावल्यावर बायकांचे ओठ चिकटले असते तर डब्यात थोडावेळ तरी शांतता असती. मग ती मॅट असो नाही तर ग्लॉसी...पण अशी लिपस्टीक असली पाहिजे...असो...

(मुंबईतल्या लोकलमध्ये प्रवास करताना वेगवेगळ्या व्यक्ती, वल्ली आणि समुह समोरून झरझर सरकत असतात. या व्यक्ती, वल्ली आणि समुहांच्या चर्चा, मतं कानावर आदळत असतात. त्यातून मनातल्या मनात विचारांची आंदोलनं उसळत असतात. ती मांडणारा हा ब्लॉग...आपल्याला नियमित ब्लॉग लिहायचाय? आम्हाला ई मेल करा webeditor@esakal.com वर. Subject लिहाः BLOG)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT