eSakal Blog Mumbai Local Talk 
Blog | ब्लॉग

सेक्स टॉक

हर्षदा परब

माझा आवडता विषय.... सर्वांचाच असतो. अगदी 90 टक्क्यांचा... पण लोक कबूल(कर)त नाहीत.

रात्रीच्या वेळी ट्रेनचा डब्बा तसा बऱ्यापैकी खाली होता. मी त्यातल्या एकीच्या अगदी शेजारीच बसले होते. दुसरी आमच्या समोर. त्या बहुधा शॉपिंग करुन सीएसटीला ट्रेनमध्ये बसल्या होत्या.  त्या दोघी गप्पा मारत होत्या. त्यात एक फोन त्यांना सारखा डिस्टर्ब करत होता. जिचा फोन वाजे ती फोन कट करे... सारखा फोन कट करे.  दुसरीने एकावेळी पटकन हात लावून मोबाईलची स्क्रिन बिघतली. 'ये तो तेरा बॉयफ्रेण्ड है ना?' 

पहिली - है ना... तुझे पता नही छोड दिया

दुसरी- पता था तुम्हारा झगडा, फिर उसने एकबार फोन भी किया था. 

पहिली- छोड उसको

दुसरी- (हसतच... थोडं खट्याळ होत) बोल ना क्या हुआ

पहिली- मुझे वो कुछ जमा नही. सेक्सके मामले मे एकदमही कम था 

दुसरी - क्या बोलती है? इतना हट्टाकट्टा... कैसा मस्त रहता है. मुझे भी अच्छा लगने लगा था 

पहिली - मुझे पता है ना. मै मेरे एक्सपिरिअन्ससे बोल रही हू

दुसरी - तो अब क्या? कोई दुसरा? या फिर शादी करेगी? 

पहिली- शादी के पहले मै तो टेस्ट करूंगी. एज्युकेशन, जॉब, सॅलरी सब के साथ वो बेड मे भी अच्छा होना चाहीए. मै तो ट्राय करकेही डिसिजन लूँगी. मेरी बुवा की लडकी का इसी वजहसे डिव्होर्स हुआ. उसका पती उसे हात ही नही लगा ता था. 

दुसरी - तो तू क्या बोलती है मै ट्रायक तेरे पहिले बॉयफ्रेण्ड को. तुझे लगता है तो ठिक नही तो ना बोल दे. मुझे कोई प्रॉब्लेम नही. 

पहिली - मै तो उसके साथ कुछ नही करनेवाली. तू तेरा डिसिजन ले. मुझे कोई प्रॉब्लेम नही. 

ट्रेनमध्ये बोलताना कोणताही लोड न घेता त्या दोघी बोलत होत्या. दिसायला छान होत्या, बऱ्यापैकी कुटूंबातल्या होत्या. त्यांचा मोकळा संवाद ऐकून छान वाटल. की अॅटलिस्ट त्या त्यांच्या विचारांबद्दल क्लिअर होत्या. बाकी लग्नाआधी शरीरसुख घेणं हे आरोग्याचा विचार करता चूक वाटत होतं. बाकी काळजी घेतल्यास काहीच हरकत नाही. काहीच जमत नाही, किंवा बाईमध्ये इण्टरेस्ट नाही म्हणून बायकोचा छळ कळणाऱ्या किंवा तिला आनंदी न ठेवू शकणाऱ्या लग्नात बरीच इतर गुंतागुंत होऊ शकते. 

ट्रेनच्या डब्यातल्या इतर आवाजाने आणि गाडीच्या आवाजात जेवढे जण हा संवाद ऐकत होते त्यातल्या दोघींनी त्यांच्याकडे रागाने बघितलं.  पण त्या असताना चर्चा नाही केली.  पाठून मग नाकं मुरडली अगदी टिपिकल. काही महिलांच्या चेहऱ्यांवर त्यांच्या धाडसाचं कौतुक करणारे एक्सप्रेशननही माझ्या नजरेतून चुकले नाहीत. ज्याने त्यांच्या बोलण्यात असलेला पॉइंट आणि त्याची गरज मला लक्षात येत होती.  त्यांच्यापाठी त्यांनी चर्चा केली. मला मात्र वाटत राहिलं मोजक्या का होईना मुली हा विचार करू लागल्यात. 

बुद्धीवाद्यांसाठी ही पोस्ट अपूर्ण किंवा चहू अंगांनी विचार करणारी नसेल. मात्र, रिपोर्टर म्हणून माझ्या दृष्टीने झालेला प्रसंग मी सांगणं ही एक पूर्ण गोष्ट  आहे. त्याच्यावर चर्चा हा माझ्यासाठी लेखाचा विषय.  

(मुंबईतल्या लोकलमध्ये प्रवास करताना वेगवेगळ्या व्यक्ती, वल्ली आणि समुह समोरून झरझर सरकत असतात. या व्यक्ती, वल्ली आणि समुहांच्या चर्चा, मतं कानावर आदळत असतात. त्यातून मनातल्या मनात विचारांची आंदोलनं उसळत असतात. ती मांडणारा हा ब्लॉग...आपल्याला नियमित ब्लॉग लिहायचाय? आम्हाला ई मेल करा webeditor@esakal.com वर. Subject लिहाः BLOG)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT