Mumbai Local Blog by Harshada Parab
Mumbai Local Blog by Harshada Parab 
Blog | ब्लॉग

सोनूला वाचता येत नाही गं..!

हर्षदा परब

इंडिकेटरवर ट्रेन यायला अजून 6 मिनिटं होती. मी कल्याणच्या दिशेने तोंडू करुन सीएसटीकडे पाठ करुन ट्रेनची वाट पाहत होते. प्लॅटफॉर्मच्या कडेला उभं राहून ट्रेन आली का हे वाकून पाहतो होते. घाईत होते एके ठिकाणी वेळेत पोहोचायचं होतं. म.रे. ची अपडाऊन दोन्ही 15 मिनिटं उशीरा धावत असल्याचं बाई सुारेख आवाजात सांगत होती. पण ट्रेनच्या प्रतिक्षेत छातीत भीती भरुन आली होती. प्लॅटफॉर्मच्या कडेला उभे असलेले सर्वजण वाकून वाकून आधी ट्रेन आली का ते पहायचे मग घड्याळात डोकावायचे. हळूहळू माझंही तेच सुरू झालं. इतक्यात मागे उभ्या असलेल्या बाईचा आवाज आला 

ती बाई - अरे नाही मिळालं लेटर. मी प्रिन्सिपलकडे गेले होते. त्यांनी सांगितलं त्या लेटर नाही देऊ शकणार. तिच्या क्लास टिचरने अजून रिपोर्ट दिला नाही. मग त्यांनी सोनू आणि तिच्या क्लास टिचरला बोलावलं. तिच्या क्लास टिचरला तर काहीत माहित नव्हतं..सोनूला फळ्यावरची फक्त मोठी अक्षरंच दिसतात. तिला वाचता येत नाही. ती स्लो लिहिते काहीच माहित नव्हतं. मग ती गेली प्रिन्सिपल बोलत होत्या.

त्यांना सांगितलं सोनूला कमी दिसतं. तिला डॉक्टरला दाखवायचंय तिचा आयक्यू टेस्ट करायचाय. तिला काही त्रास असेल तर वेगळ्या शाळेत घालायचं आहे. त्यासाठी आम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. मग प्रिन्सिपलने सांगितलं आम्ही तुम्हाला टिचरच्या रिपोर्टनंतर सर्टिफिकेट देऊ. आता टिचरने तर काही नाही केलं. काय माहिती आता सोनूवर सगळा राग निघतोय की काय होतं ते? मी मागे वळून पहायचं नाही एवढं ठरवलं. माझ्यासाठी एवढंच महत्त्वाचं नतंर घरगुती टॉक सुरू झाला. पण तिचा निळा स्लिवलेस टॉप तिरक्या नजरेने टिपलाच होता.

धडाडत गेलेल्या तीन - चार मेलनंतर ट्रेन आली. मी कशीबशी घुसले ट्रेनमध्ये. सीटच्या मधल्या जागेत उभं राहायला थोडी जागा मिळाली. धक्का मारत एक बाई हिसडा देऊन आत येत होती. मगाशी सोनूबद्दल बोलणारी हीच बाई असा अंदाज लावला म्हटलं भांडणासाठी कशाचंही निमित्त पुरे होईल. तेव्हा शांतच राहिले.  माझ्या उजव्या हाताला ती निळा टॉपवाली आणि डाव्या हाताला आणखी एक बाई. त्या दोघींच्यामध्ये मी. 

निळा टॉपवाली - अगं मुलीच्या शाळेत गेले होते. आम्हाला गावी जायचं आहे ना. म्हणून मग शाळेत परमिशन घ्यायला गेले होते. (या संभाषणा दरम्यान सोनू ही त्या बाईची मुलगी असल्याचं मला कळलं)

(तिचं फोनवरचं सोनूबद्दलचं बोलणं मी ऐकलं होतं फक्त मैत्रिणीला कळू नये म्हणून ती हे बोलत होती. किंवा ती चेक करत होती तिने तिचं आधीचं फोनवरचं बोलणं ऐकलं तर नाही ना)

हिरवा ड्रेसवाली - महाशिवरात्रीला जाणार का गावी 

निळा ड्रेसवाली - हो... बरेच दिवस शाळेत जाईन असं म्हणत होते. राहून जात होतं. पण आज म्हटलं ऑफिसला उशीराच जाऊ. शेवटी जाऊन आले. तुला का उशीर झाला. 
हिरवा ड्रेसवाली - प्लॅटफॉर्मला उतरले तर आधीची गाडी सुटली. हिला मग उशीर झाला. 

हिरवा ड्रेसवाली बोलायला फार उत्सुक नव्हती. मग निळ्या ड्रेसवालीने मोबाईल काढला. स्क्रिनवर स्क्रोल करुन तिने डिअर 2 हा नंबर लावला. 

निळा ड्रेसवाली फोनवर - मला गाडी मिळाली. मी ठाण्याला पोहोचेन. संध्याकाळी भेटल्यावर बोलू

फोन बंद झाला तेव्हा दिसलं तिच्या फोनवर स्क्रिन सेव्हर म्हणून सरस्वती मोबाईलच्या बॅकग्राउण्ड वॉलपेपरला होती आणि ती सारखा लक्ष्मीचा फोटो बघत होती. 

एव्हाना कुर्ला आलं होतं. मी उतरुन गेले. काळजी वाटत राहिली सोनूची. क्लास टिचरला अजून कसं कळलं नाही सोनूला वाचता येत नाही. तिला दिसत नाही. एवढ्या मोठ्या वर्गात बाईंचं मुलांकडे लक्ष ठेवणं कठीण. पण ही गोष्ट का लपून राहिली. आई-बाबांना ही गोष्ट उशीरा का लक्षात आली? पण दिलासा वाटत होता पालक सोनूला वेगळ्या शाळेत घालायला तयार होते. म्हणजे तिचं तसं असणं त्यांनी स्विकारण्याची तयारी केली होती. हा विषय निराळा की सोनूला त्याच शाळेत शॅडो टिचरच्या मदतीने शिकता येईल. तो तिचा अधिकार आहे.

(मुंबईतल्या लोकलमध्ये प्रवास करताना वेगवेगळ्या व्यक्ती, वल्ली आणि समुह समोरून झरझर सरकत असतात. या व्यक्ती, वल्ली आणि समुहांच्या चर्चा, मतं कानावर आदळत असतात. त्यातून मनातल्या मनात विचारांची आंदोलनं उसळत असतात. ती मांडणारा हा ब्लॉग...आपल्याला नियमित ब्लॉग लिहायचाय? आम्हाला ई मेल करा webeditor@esakal.com वर. Subject लिहाः BLOG)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT